मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अर्जुन कपूरने मलायकाला मिठीत घेऊन चाहत्यांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, PHOTO तुफान व्हायरल

अर्जुन कपूरने मलायकाला मिठीत घेऊन चाहत्यांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, PHOTO तुफान व्हायरल

मलायका अरोराने (Malaika arora) इंन्स्टाग्रामवर (Instagram) बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचा (Boyfried Arjun kapoor) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अर्जुनने मलायकाला आपल्या मिठीत घेतलं आहे.

मलायका अरोराने (Malaika arora) इंन्स्टाग्रामवर (Instagram) बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचा (Boyfried Arjun kapoor) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अर्जुनने मलायकाला आपल्या मिठीत घेतलं आहे.

मलायका अरोराने (Malaika arora) इंन्स्टाग्रामवर (Instagram) बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचा (Boyfried Arjun kapoor) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अर्जुनने मलायकाला आपल्या मिठीत घेतलं आहे.

मुंबई, 1 जानेवारी: 2021 वर्षाची सुरुवात (New Year 2021) झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांसोबत आपले फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यास सुरुवात केली आहे. मलायका अरोरानेही (Malaika Arora) 2021 वर्षाची सुरुवात करताना अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो टाकला आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मलायका अरोराने गेल्या आठवड्यात गोव्यात अर्जुन, अम्रीता अरोरा आणि तिच्या कुटूंबियांसमवेत सुट्टी घालवली आहे. यावेळी तिने काढलेल्या फोटोंनी इंटरनेटवर धम्माल केली होती. काल रात्री तिने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेट टुगेदर केलेले दमदार फोटो शेअर केले आहेत.

मलायका अरोराने तिच्या इंन्स्टाग्राम हॅन्डलवर सुरुवातीला एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. यामध्ये अर्जुन कपूर, बहीण अमृता अरोरा आणि इतर कुटुंबिय आहेत. इंन्स्टाग्रामवरील दुसऱ्या स्टोरीत तिने बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर सोबत फोटो शेअर केला आहे. अर्जूनने मलायकाला आपल्या मिठीत घेतलं आहे. त्यामुळे हा फोटो आणखीचं धमाकेदार दिसत आहे. या फोटोत तिने शिम्मर पॅन्टसूटसोबत मॅचिंग बिकीनी  परिधान केली आहे. तर अर्जुनने तपकिरी रंगाची पँट व्हायब्रंट शर्टमध्ये एकदम कुल लुक ठेवला आहे. 2021 वर्षाच्या सुरुवातीलाच असा  मनमोहक फोटो शेअर केल्याने अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांचा खऱ्या अर्थाने नवीन वर्ष आनंदात सुरू झालं आहे.

मलायका आणि अर्जुन यांनी नुकतंच धरमशाला इथं दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या आहेत. बॉलिवूडचं कूल कपल सैफ अली खान आणि करिना कपूर हे दोघेसुद्धा त्यांच्यासोबत होते. अर्जुन आणि सैफ तिथं आगामी सिनेमा 'भूत पोलीस'चं शूटिंग करत होते. त्या निमित्ताने करिना आणि मलायका दोघीही धरमशालाला भेटायला गेल्या होत्या. करिश्मा-करिनाच्या घट्ट मैत्रिणींमध्ये मलायकाचाही समावेश आहे. या तिघींचे एकत्र धमाल करतानाचे अनेक फोटो त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं हेसुद्धा सांगितलं, की तिनं लॉकडाऊनचा काळ अर्जुनसोबत घालवला. अर्जुनमुळं हा काळ तिला कंटाळवाणा न होता खूप खास गेला. तिनं सांगितलं, की अर्जुन खूप एंटरटेनिंग आहे. त्याच्यासोबत घालवलेला कुठलाच क्षण रटाळ नसतो. अनेकदा तो माझी मजा घेतो, पण तेही आनंद देणारं असतं.'

First published:
top videos

    Tags: Arjun kapoor, Bollywood, Malaika arora