मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मलायकाला सोडून अर्जुन कपूर कोणासोबत गेला ब्लाइंड डेटवर, पाहा VIDEO

मलायकाला सोडून अर्जुन कपूर कोणासोबत गेला ब्लाइंड डेटवर, पाहा VIDEO

नुकताच अर्जुन ब्लाइंड डेटवर गेला होता पण ती व्यक्ती मलायका अरोरा नव्हती.

नुकताच अर्जुन ब्लाइंड डेटवर गेला होता पण ती व्यक्ती मलायका अरोरा नव्हती.

नुकताच अर्जुन ब्लाइंड डेटवर गेला होता पण ती व्यक्ती मलायका अरोरा नव्हती.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 31 जानेवारी : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतातच. सध्या हे बी टाऊनमधलं सर्वात लोकप्रिय कपल आहे. नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर हे दोघंही नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. पण आता अर्जुन चर्चेत आहे ते खास व्यक्तीसोबतच्या त्याच्या ब्लाइंड डेटमुळे. नुकताच अर्जुन ब्लाइंड डेटवर गेला होता. पण ती व्यक्ती मलायका अरोरा नव्हती. मग ही खास होती तरी कोण.

निर्माता करण जोहर लवकरच नेटफ्लिक्सवर एक नवा शो आणत आहे. What the Love असं या शोचं नाव आहे. या शोमध्ये अर्जुन कपूर कन्टेस्टंट आशीसोबत ब्लाइंड डेटवर गेला होता. याचा व्हिडीओ अर्जुन कपूरनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, What the Love चे बिहाइंड द सीन्स. ही माझी पहिली ब्लाइंड डेट होती. पण हा खूपच सुंदर अनुभव होता. हा शो नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे.

प्रियांका आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण, घराची किंमत्त ऐकून व्हाल थक्क

या व्हिडीओमध्ये आशीसोबत अर्जुन कपूर खूपच कम्फर्टेबल दिसत आहे. दोघंही एकत्र खूप एन्जॉय करताना दिसत आहे. एकमेकांशी गप्पा मारत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अर्जुनच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

View this post on Instagram

This one was my first blind date, but it was a good one. What The Love! Now streaming on Netflix. #WhatTheLove @netflix_in

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

मलायका-अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं तर अर्जुन मलायकाबद्दल खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी मलायकाच्या घरासमोर उभ्या राहणाऱ्या फोटोग्राफर्सना रात्रभर त्या ठिकाणी न थांबण्याची विनंती केली होती. या दोघांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र हे दोघंही त्यावर फारसं लक्ष देत नाहीत.

महिलांना अस्तित्वाची जाणिव करुन देणारी 'थप्पड', पाहा तापसीचा दमदार परफॉर्मन्स

View this post on Instagram

Getting ready for the new decade with a smile on my face 😊

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो शेवटचा पानिपत सिनेमात दिसला होता. हा एक ऐतिहासिक सिनेमा होता. या सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केलं होतं. या सिनेमात अर्जुनसोबतच संजय दत्त आणि कृती सेनन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली असली तरीही समीक्षकांनी सिनेमाला खूपच चांगले रिव्ह्यू दिले होते.

अंडरवर्ल्डच्या डॉनशी भिडली होती प्रीती झिंटा, न घाबरता कोर्टात दिली साक्ष

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood