'त्या' इन्स्टाग्राम पोस्टवरून अर्जुन कपूरनं घेतली मलायकाची फिरकी

malaika arora instagram post या कमेंटनंतर अर्जुनचे चाहते त्याच्या विनोदबुद्धीचं करत आहेत कौतुक.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 06:50 AM IST

'त्या' इन्स्टाग्राम पोस्टवरून अर्जुन कपूरनं घेतली मलायकाची फिरकी

मुंबई, 21 जून : बॉलिवूडची फिटनेस आयकॉन अभिनेत्री मलायका अरोरा मागच्या काही काळापासून अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मलायकाकडे सध्या कोणताही सिनेमा नसला तरीही ती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. ती नेहमीच तिचे फिटनेस बाबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले ज्यामुळे ती सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली पण याच कारण तिचे फोटो नसून अर्जुन कपूर आहे. या फोटोवर कमेंट करताना अर्जुनने असं काही म्हटलं की चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

या 5 कारणांसाठी पाहायला हवा शाहिद कपूरचा ‘Kabir Singh’

 

Loading...

View this post on Instagram

 

#tuesdayteachings .... 5 steps on how u can learn to tie a ponytail ‍♀️‍♀️ ......#tossntie (swipe right )

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले, ज्यात तिनं पोनीटेल बांधायची ट्रिक सांगितली. यासाठी तिनं वेगवेगळे 5 फोटो शेअर केले आणि यासोबत तिनं 5 स्टेपमध्ये पोनीटेल कशी बांधायची हे शिकवण्याचा प्रयत्न केला. मलायकाच्या या फोटोवर मात्र अर्जुननं तिची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. या फोटोंवर कमेंट करताना अर्जुननं लिहिलं, पाच फोटोंनंतरही केस मोकळेच राहिले आणि पोनीटेल बांधली गेली नाही.

World Refugee Day निर्वासित मुलांसाठी प्रियांका चोप्राचं भावनिक आवाहन

मलायकाच्या या पोस्टवरील अर्जुनची कमेंट मात्र थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाली. या कमेंटनंतर अर्जुनचे चाहते त्याच्या विनोदबुद्धीचं कौतुक करत आहेत. तसं पाहायला गेलं तर अर्जुनच्या मलायकाच्या फोटोवरील कमेंट व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा अशाप्रकारे या दोघांच्याही एकमेकांच्या फोटोंवरील कमेंट चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पण यावेळची अर्जुनची कमेंट मात्र काहीशी हटके होती.

बहीण सुनैनाच्या आरोपांनंतर हृतिकच्या मदतीला धावून आली एक्स वाइफ सुजैन खान

=========================================================

VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनला, पण ती प्रियकरासोबत पळाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 06:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...