Home /News /entertainment /

अर्जुन कपूरच्या विनोदी कमेंटवर अनुष्का शर्माचं धम्माल उत्तर!

अर्जुन कपूरच्या विनोदी कमेंटवर अनुष्का शर्माचं धम्माल उत्तर!

अभिनेता अर्जुन कपूर बॉलिवूड सेलिब्रेटींच्या फोटोंवर विनोदी कमेंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

  मुंबई, 16 जानेवारी : अभिनेता अर्जुन कपूर मागच्या काही काळापासून मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. पण याशिवाय तो बॉलिवूड सेलिब्रेटींच्या फोटोंवर विनोदी कमेंट करण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मलायका असो वा करिना किंवा मग परिणीती चोप्रा तो नेहमीच बॉलिवूड सेलिब्रेटींच्या फोटोवर अशा विनोदी कमेंट करताना दिसतो. असाच आता अर्जुननं अनुष्का शर्माच्या फोटोवर कमेंट केली मात्र त्याच्या या कमेंटवर अनुष्कानंही धम्माल उत्तर दिलं आहे. अनुष्कानं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टग्रामवर शेअर केला होता. ज्यात ती सकाळच्या कोवळ्या ऊनात कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्कानं लिहिलं, ...आणि अशाप्रकारे माझ्या घराच्या बाल्कनीत येणारा सूर्यप्रकाश आणि एक कप कॉफी काही सुंदर आठवणी तयार करतात. अनुष्काचा हा फोटो विराट कोहलीनं क्लिक केला आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना घरावर इनकम टॅक्स अधिकाऱ्यांची छापेमारी
  अनुष्का शर्माच्या या फोटोवर अर्जुन कपूरनं विनोदी कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, सॉक्सची ड्रायक्लिनिंग माशाअल्लाह जबरदस्त आहे. मग काय यावर गप्प बसेल ती अनुष्का कसली तिनं सुद्धा अर्जुनला धम्माल उत्तर देऊन टाकलं. अर्जुनच्या कमेंट रिप्लाय देताना तिनं लिहिलं, बॉस आम्ही सॉक्स धुतो. सॉक्सची ड्रायक्लिनिंग कोण करतं? ऊसाच्या शेतात PHOTO काढून फसली अनन्या पांडे; युजर्स म्हणाले, हिचं स्ट्रगल तर... अर्जुन-अनुष्काच्या या कमेंट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनुष्काच्या हजरजबाबीपणाचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. अर्जुनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर मागील वर्षी त्याचा पानिपत हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर आता संदीप आणि पिंकी फरार या सिनेमात तो दिसणार आहे. तर अनुष्का मागच्या काही काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र लवकरच ती भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे भारतीय क्रिकेट जर्सीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. Shershaah first look रिलीज, सिद्धार्थ मल्होत्राला मिळालं वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Anushka sharma, Arjun kapoor, Bollywood

  पुढील बातम्या