Home /News /entertainment /

ब्रेकअपबाबत Arjun Kapoor चा मोठा खुलासा; Malaika arora सोबतचा फोटो पोस्ट करत म्हणाला....

ब्रेकअपबाबत Arjun Kapoor चा मोठा खुलासा; Malaika arora सोबतचा फोटो पोस्ट करत म्हणाला....

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या ब्रेकअप झाल्याचे (Malaika Arora and Arjun Kapoor broken up) वृत्त आज सकाळपासून चर्चेत होते. यावर अर्जुन कपूरने प्रतिक्रिया देत ब्रेकअपविषयी मोठा खुलासा केला आहे.

  मुंबई, 12 जानेवारी- अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या ब्रेकअप झाल्याचे (Malaika Arora and Arjun Kapoor broken up) वृत्त आज सकाळपासून चर्चेत होते. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या कपलने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. मात्र यावर अधिकृतपणे अर्जुन व मलायकाची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता या सर्व प्रकरणावर अर्जुन कपूरची  (Arjun Kapoor ) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अर्जुन कपूरने मलायका आरोरासोबतच सुंदर फोटो शेअर करत म्हटले आहे की, असल्या अंधूक म्हणजे अधार नसलेल्या अफावांना आयुष्यात कोणतेच स्थान नाही. चांगले राह... लव्ह यू ऑल..असं म्हणत त्यांने ब्रेकअपच्या अफवांना फेटाळून लावले आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या पोस्टवर मलायका आरोरा हिने देखील कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

  मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त BollywoodLife.com ने दिले आहे. एका सूत्राने या पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, 'सहा दिवसांहून अधिक काळ मलायका अरोरा घरातून बाहेर पडलेली नाही. ती पूर्णपणे आयसोलेशनमध्ये आहे. ती अत्यंत दु:खी असून काही काळ जगापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. तर अर्जुन कपूरही या दिवसांत एकदाही तिला भेटायला गेलेला नाही. अर्जुन तीन दिवसांपूर्वी बहिण रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता. रियाचे घर मलायकाच्या घराच्या अगदी जवळ आहे आणि तरीही तो डिनरनंतर तिला भेटला नाही. मलायका सहसा अर्जुनसोबत अशा फॅमिली डिनरला हजेरी लावते पण यावेळी ती त्याच्यासोबत दिसली नाही.' वाचा-बॉलिवूडमधून मोठी बातमी! Malaika Arora आणि Arjun Kapoor यांचं ब्रेकअप काही दिवसांपूर्वीच मलायकाने अर्जून कपूरला मिस करत असल्याचं कॅप्शन देत एक फोटो शेअर केला होता. ज्यात दोघेजण व्हेकेशन एंजॉय करत असल्याचं दिसत होते. हा फोटो शेअर करत तिने अर्जूनला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अर्जूनने देखील हाच फोटो पोस्ट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आठवडाभरातच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र अर्जुन कपूरने या बातम्या फेटाळून लावत हम साथ साथ है चा नारा दिला आहे. चाहत्यांनी देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Arjun kapoor, Bollywood News, Entertainment, Malaika arora

  पुढील बातम्या