मलायका झाली अर्जुनची चाहती,'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या टीझरबाबत म्हणाली...

मलायका झाली अर्जुनची चाहती,'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या टीझरबाबत म्हणाली...

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चा टीझर अर्जुन कपूरनं आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

  • Share this:

मुंबई, 17, एप्रिल : सध्या बॉलिवूडमध्ये नवनवीन सिनेमांच्या रिलीजच्या चर्चा सुरू आहेत. एका बाजूला सलमान खान आपल्या आगामी सिनेमा 'भारत'च्या पोस्टर्समुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे अभिनेता अर्जुन कपूरही त्याचा आगामी सिनेमा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'मुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कौतुकासोबतच टीझरवर नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा येत आहेत.

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चा टीझर अर्जुन कपूरनं आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. टीझर पाहून काहींना सिनेमाची कथा आणि अर्जुन कपूरचा अ‍ॅक्शन अंदाज आवडला तर काहींना हा टीझर अजिबात आवडला नाही. एकूणच संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चा टीझर कोणाला आवडो न आवडो पण हा टीझर पाहिल्यावर मलायका अरोरा मात्र अर्जुनची चाहती बनली आहे. याआधीही सिनेमाच्या पोस्टवर हॉट इमोजी पोस्ट केल्यानं मलायका चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिनं टीझरवर Awesome अशी कमेंट करत टाळ्या वाजवणाऱ्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. यामुळे मागच्या काही दिवसांपासून अफेअर्सच्या वृत्तामुळे चर्चेत असलेल्या या कपलची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चं दिग्दर्शन राज कुमार गुप्तानं केलं असून यापूर्वी रेड सिनेमामुळे राज कुमार गुप्ता चर्चेत आला होता.'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' सिनेमा येत्या 24 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

First published: April 17, 2019, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading