सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडनं शेअर केला हॉट फोटो, अर्जुन कपूरनं केली ‘ही’ कमेंट

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडनं शेअर केला हॉट फोटो, अर्जुन कपूरनं केली ‘ही’ कमेंट

सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद संपूर्ण बॉलिवूडमध्ये सर्वाच्या परिचयाचा आहे. अशातच आता अर्जुन सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या फोटोवर कमेंट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद संपूर्ण बॉलिवूडमध्ये सर्वाच्या परिचयाचा आहे. सलमानची बहिण अर्पिता खानसोबत ब्रेकअप केल्यानंतर सलमान आणि अर्जुन यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अरबाज खानची घटस्फोटीत पत्नी मलायका अरोराला डेट करायला सुरावात केल्यापासून हा वाद आणखी चिघळला. त्यानंतर आता अर्जुन सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफच्या फोटोवर कमेंट केल्यानं चांगलाच चर्चेत आला आहे. कतरिनानं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर अर्जुन एक गंमतीशीर कमेंट केली असून विशेष म्हणजे यावर कतरिनानं सुद्धा त्याला रिप्लाय दिला आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ खूप कमी वेळ सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र ती जेव्हाही सोशल मीडियावर तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते त्यावेळी ते चर्चेचा विषय ठरतात. आताही असंच काहीसं झालं आहे. तिनं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कोणत्यातरी बीचवर उभी असलेली दिसत आहे. कतरिनाचा हा बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच अर्जुन कपूरनं तिची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. त्यानं या फोटोवर ‘बघ तु कुठे जात आहेस, आशा करतो की, पोज देताना कुठे त्या खांबावर आदळली नसशील.’ अशी गंमतीशीर कमेंट केली. त्यावर कतरिनानंही त्याला रिप्लाय दिला. ती म्हणाली, ‘मी काळजी घेईन.’

सलमान सुद्धा घेणार ‘नच बलिये 9’मध्ये भाग, कोण असेल त्याची जोडीदार

अर्जुन कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केल्यानं चर्चेत असतो. मागच्या आठवड्यात गर्लफ्रेंड मलायका त्याच्या निशाण्यावर होती. त्या दोघांनी अर्जुनचा वाढदिवस एकत्र साजरा केला. तसेच त्यावेळी मलायकानं पहिल्यांदाच अर्जुनचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्यानंतर झायरा वसीमची सोशल मीडियावर भावुक पोस्ट, म्हणाली..

 

View this post on Instagram

 

Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच त्याचा आगामी सिनेमा पानिपतच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर कतरिनानं सध्या तिचा आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमात अक्षय कुमारच्या ‘मोहरा’ सिनेमातील गाणं ‘टिप टिप बरसा पानी’ रिक्रिएट केलं जाणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून अक्षय कुमार आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसापूर्वी या सिनेमातील कतरिनाचे टॉवेलमधील फोटो व्हायरल झाले होते ज्यात तिच्यासोबत प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर फराह खान सुद्धा दिसली होती.

‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अमरनाथ यात्रेला जाताना वडीलांचा मृत्यू

===========================================================

VIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय?

First published: July 14, 2019, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading