मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अर्जुन कपूरने मलायकाला दिलं रोमँटिक सरप्राईज! मालदीवमधील डिनर डेटचा VIDEO VIRAL

अर्जुन कपूरने मलायकाला दिलं रोमँटिक सरप्राईज! मालदीवमधील डिनर डेटचा VIDEO VIRAL

 मलायका अरोरा   (Malaika Arora)   आणि अर्जुन कपूर   (Arjun Kapoor)   नुकताच मालदीवमध्ये रोमँटिक  वेळ घालवून परतले आहेत. दोघेही मालदीवमधील त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ अजूनही आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 7 डिसेंबर-   मलायका अरोरा   (Malaika Arora)   आणि अर्जुन कपूर   (Arjun Kapoor)   नुकताच मालदीवमध्ये रोमँटिक  वेळ घालवून परतले आहेत. दोघेही मालदीवमधील त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ अजूनही आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत आहेत. दरम्यान, काही वेळापूर्वी अर्जुनने मलायकासोबतचा एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये अर्जुन मलायका अरोराला सरप्राईज करताना दिसत आहे. त्याने मलायकासाठी रोमँटिक डिनर डेटची व्यवस्था केली होती. स्वत:साठी सरप्राईज डिनर डेट पाहून तिला खूप आनंद झाला आहे. व्हिडिओमध्ये फक्त मलायका दिसत आहे. अर्जुनने समुद्रकिनारी ही रोमँटिक डिनर डेट आयोजित केली होती. अर्जुनने शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहू शकता-

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने नवीन अभिनेत्रीला मागे टाकताना दिसत आहे. मलायकाच्या फोटोंमध्ये तिचा परफॉर्मन्स पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढते. मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.मलायका अरोराही पापाराझींची आवडती आहे. जिमपासून योगा सेशनपर्यंत किंवा लंच-डिनरपर्यंत पापाराझी तिला फॉलो करतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा यूजर्स मलायकाच्या फिटनेस आणि फिगरची जोरदार प्रशंसा करतात. तर अनेक वेळा तिला ट्रोल केले जाते.

(हे वाचा:विकी-कतरीना पोहोचले वेडिंग प्लेस; राजस्थानी थाटात झालं जोडप्याचं जंगी स्वागत )

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. या दोघांच्या नात्याची चर्चा मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगत असते. त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा केल्यानंतर दोघेही मोठ्या सहजतेने लोकांसमोर येतात. दोघे अनेकदा आउटिंग आणि डिनर डेटला एकत्र जातात.तसेच दोन दिवसांपूर्वी अर्जुनने एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये अर्जुन आणि मलायका दोघेही स्विमिंग पूलमध्ये एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अर्जुनने लिहिलेले कॅप्शन अधिक चर्चेत आले होते. व्हिडिओ शेअर करताना अर्जुनने लिहिले, 'जेव्हा गर्लफ्रेंड तुमच्या ट्रेनरपेक्षा कठीण टास्कमास्टर असते!!!'. तसेच माजी जागतिक किकबॉक्सिंग चॅम्पियन ड्रू नीलला टॅग करत त्याने लिहिले, 'हे बघ ड्र्यू नील, मी सुट्टीतही मालदीवमध्ये वर्कआउट करत आहे. धन्यवाद मलायका अरोरा.'

First published:

Tags: Arjun kapoor, Entertainment, Malaika arora