मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हातात हात घालून फिरताना दिसले मलायका-अर्जुन, चाहते म्हणतात आता लवकर...

हातात हात घालून फिरताना दिसले मलायका-अर्जुन, चाहते म्हणतात आता लवकर...

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 14 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लुकमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात काही दिवसांपूर्वीच मलायका जिम आऊटफिट्समुळे चर्चेत आली होती. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. याशिवाय मलायका आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असते ते म्हणजे अर्जुन कपूरसोबतचं तिचं रिलेशनशिप. आता हे हॉट कपल पुन्हा एकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. एवढंच नाही तर अर्जुन सुद्धा मलायकाला अगदी एखाद्या प्रिन्सेससारखी वागणूक देताना दिसतो आहे. यावेळी मलायकानं ब्लॅक पॅन्ट, व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लॅक जॅकेटमध्ये तर अर्जुन ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंचीच चर्चा होताना दिसत आहे. संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 24 तासांत निलेश साबळेंचा माफीनामा
View this post on Instagram

#arjunkapoor #malaikaarora

A post shared by Anil Nalawade (@anil_nalawade) on

सोशल मीडियावरील या फोटोंवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांनी आता लवकरच लग्न करा असा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्यांच्या लव्ह केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. काही युजर्सनी मात्र अर्जुन मलायकाला ट्रोल करायची संधी सोडलेली नाही. तिच्या ड्रेसिंगवरुन तिच्यावर कमेंट करण्यात आल्या आहेत. आणखी एका मावळ्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर, ‘सरसेनापती हंबीरराव’चं पोस्टर रिलीज
View this post on Instagram

#arjunkapoor and #malaikaarora at #buntysajdeh bash . . . #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मलायका आणि अर्जुननं त्यांचं नात सर्वांसमोर कबुल केलं आहे. मात्र लग्नाच्या प्लान बद्दल त्यांनी अद्याप काहीही सांगितलेलं नाही. एका मुलखतीत मलायकानं सध्या लग्नाचा कोणताही प्लान नसल्याचं म्हटलं होतं. यासोबतच जेव्हाही आम्ही लग्न करु त्यावेळी सर्वांना नक्की सांगू असं म्हटलं होतं. 'त्यानं तर माझ्याही जाहिराती हिसकावल्या…’ कपिलचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप
First published:

Tags: Bollywood, Malaika arora

पुढील बातम्या