Home /News /entertainment /

अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे मलायका, पाहा रोमँटिक VIDEO

अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे मलायका, पाहा रोमँटिक VIDEO

अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीमधील मलायका-अर्जुनची रोमँटिक केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  मुंबई, 05 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या त्यांचं रिलेशनशिप एन्जॉय करत आहेत. मागच्या काही काळापासून या दोघांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. प्रसार माध्यमांसमोर हे नातं कबुल केल्यानंतर हे दोघंही अनेकदा एकत्र दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीमध्ये या दोघांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी एकमेकांच्या हातात हात घालून या पार्टीमध्ये एंट्री केली. यावेळी सर्वांच्याच नजरा या दोघांच्या लुकवर खिळल्या होत्या. या दोघांनीही कॉन्ट्रास्ट कलरचे आऊटफिट्स घातले होते. ज्यात ते खूपच एकमेकांना परफेक्ट मॅच करत होते. या दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन घरात कोणाला घाबरतो? आई जया बच्चन यांना की बायको ऐश्वर्याला...
  या रिसेप्शन पार्टीसाठी अर्जुननं ग्रीन कलरची शेरवानी घातली होती. तर मलायकानं हॉट रेड कलरची साडी नेसली होती. या पार्टीतील मलायका आणि अर्जुनचा हा लुक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समोर आला आमिर खानचा नवा लुक, पाहा PHOTO अर्जुन कपूर आणि मलायका जवळपास मागच्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे या वर्षी हे दोघं लग्न करतील असा अंदाज लावला जात आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर काही दिवसांतच या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र बराच काळ या दोघांनीही या नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. असंही म्हटलं जात की अर्जुनसोबतच्या नात्यामुळेच अरबाज मलायकामध्ये दुरावा आला होता.
  वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी सिनेमाची तयारी करत आहे. या सिनेमाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री राकुल प्रीत स्क्रिन शेअर करणार आहे. याआधी तो पानीपत या ऐतिहासिक सिनेमात दिसला होता. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. तर मलायका सिनेमांपासून दूर असली तरीही टेलिव्हिजन वर मात्र ती सक्रिय आहे. लता दीदींचं गाणं गातेय 2 वर्षांची मुलगी, हा VIDEO नाही तर मग काय पाहिलं!
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Malaika arora

  पुढील बातम्या