गायक अरिजीत सिंगने मुंबईत खरेदी केले 4 फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क!

गायक अरिजीत सिंगने मुंबईत खरेदी केले 4 फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क!

आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजावणाऱ्या अरिजीत सिंगने मुंबईत 4 फ्लॅट खरेदी केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजावणाऱ्या अरिजीत सिंगने मुंबईतल्या वर्सोवामधील एका इमारतीमध्ये 9 कोटी किंमतीचे 4 फ्लॅट खरेदी केले आहेत. इतकचं नाही तर त्याने या फ्लॅटसाठी 54 लाखांची स्टॅम्प ड्युटीही दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अरिजीतने इमारतीमधील एकाच मजल्यावर हे 4 फ्लॅट खरेदी केले आहेत.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, त्याने खरेदी केलेल्या फ्लॅटमधील एक फ्लॅट 32 स्क्वेअर मीटरचा असून त्याची किंमत 1.80 कोटी इतकी आहे. दुसरा फ्लॅट हा जवळपास 70 स्क्वेअर मीटर इतका असून त्याची किंमत 2.20 कोटी आहे. तर अरिजीतने दिलेल्या माहितीनुसार तिसरा फ्लॅट 80 स्क्वेअर मीटर इतका असून त्याची किंमत 2.60 करोड इतकी आहे. तर चौथा फ्लॅट हा 70 स्क्वेअर मीटरचा असून त्याची किंमत 2.5 कोटी आहे.

फोर्ब्सच्या सेलिब्रिटी 2019 च्या यादीतही अरिजीतचा समावेश होता. या यादीत 71.95 कोटी रुपयांची कमाई करत अरिजीत 26व्या स्थानावर होता. इतकचं नाही तर 2019 यावर्षात अरिजीत सर्वाधिक पसंती मिळणारा गायकही ठरला होता. अरिजीत सिंगने आतापर्यंत अनेक अवॉर्ड मिळवले आहेत. अरिजीत सिंगने आपल्या गाण्यांनी अनेकांना भुरळ घातलीये. केवळ भारताताचं नव्हे तर भारताबाहेरही अरिजीत सिंगच्या गाण्याच्या अनेक चाहते आहेत.

अरिजीत सिंगने 2011 मध्ये बॉलिवूड गाण्यांच्या दुनियेत पदार्पण केलं. 2011मध्ये अरिजीतला ‘मर्डर 2’,  ‘राबता’ आणि ‘बर्फी‘ या सिनेमांमध्ये गाणं गाण्याची संधी मिळाली होती. तर आता अरिजीत सिंगची 2 नवी गाणी चाहत्यांच्या भेटील येत आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव आज कल‘ सिनेमात ‘शायद‘ आणि ‘हा मैं गलत‘ ही गाणी गाणार आहे.

First published: February 12, 2020, 5:22 PM IST

ताज्या बातम्या