Oops Moment : पॉप सिंगरचा लाइव्ह कॉनसर्टमधील VIDEO VIRAL

Oops Moment : पॉप सिंगरचा लाइव्ह कॉनसर्टमधील VIDEO VIRAL

हॉलिवूडची पॉप सिंगर लाइव्ह कॉनसर्टमधला ‘Oops Moment’चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पाहा नक्की काय झालं...

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : स्टेजवर लाइव्ह परफॉर्मन्स करणं दिसत तेवढं सोप्प नसतं. अशात एखाद्या लाइव्ह परफॉर्मन्समध्ये जर काही गडबड झाली तर ते अधिकच कठिण होतं. असंच काहीसं एका प्रसिद्ध पॉप स्टारसोबत घडलं. ज्यामुळे ती लाइव्ह कॉनसर्टमध्ये ‘Oops Moment’ची शिकार झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारी 26 वर्षीय एरियाना ग्रांडे सध्या स्वेटनर टूरवर आहे. ज्यासाठी ती वेगवेगळ्या शहरात शो करत आहेत. याच टूरमधील एका लाइव्ह शोमध्ये एरियाना अचानक स्टेजवर पाय घसरुन पडली. यावेळी ती तिचा लोकप्रिय अल्बम ‘थँक्यू नेक्स्टा’मधील बॅड आयडिया हे गाणं गात होती. या परफॉर्मन्सच्या वेळी एरियानानं खूपच उंच हिल्स घातली होती. परफॉर्मन्स करता करता ती एका टेबलवर चढली आणि चालू लागली. पण असं करत असताना तिचा बॅलन्स बिघडला आणि ती घसरुन खाली पडली.

VIDEO : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकानं करुन दिली आठवण

एरियाना लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान खाली पडली त्यावेळी एक चांगली गोष्ट अशी होती की, तिच्या बाजूला डान्स करत असलेल्या एका डान्सरनं तिला सावरलं आणि उचलून घेतलं. स्वतःसोबत घडलेला हा प्रसंग पाहून एरियाना हसू लागली आणि तिनं पुन्हा एकदा परफॉर्म करायला सुरुवात केली.

लग्नाच्या वाढदिवसाआधीच प्रियांकाचं निकला स्पेशल गिफ्ट, घरी आला छोटा पाहुणा

एरियानाचा हा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. तिच्या या अंदाजाचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे. खाली पडल्यानंतरही पुन्हा एकदा उभं राहून आत्मविश्वासानं परफॉर्म करणं खरंच कठीण असतं मात्र एरियानानं ते करुन दाखवलं. सोबतच मजेदार गोष्ट ही होती की, त्यावेळी तिथे सुरू असलेलं म्यूझिक सुद्धा या सर्व प्रसंगाशी मिळतं-जुळतं होतं. ज्यावेळी ती पडली त्यावेळी असं वाटत होतं की ती म्यूझिक बीटवरच पडली.

आधी फक्त शर्ट घालून बाहेर पडली, आता मेकअपमुळे फसली मलायका अरोरा

=================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 27, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या