S M L

अभिषेक-ऐश्वर्या सोडणार का अमिताभचं घर?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी वांद्रा कुर्ला काॅम्प्लेक्सला नवा फ्लॅट विकत घेतला. तेव्हापासून सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय, अभिषेक-ऐश्वर्या जलसा सोडून जाणार का?

Sonali Deshpande | Updated On: Jan 9, 2018 04:38 PM IST

अभिषेक-ऐश्वर्या सोडणार का अमिताभचं घर?

09 जानेवारी : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी वांद्रा कुर्ला काॅम्प्लेक्सला नवा फ्लॅट विकत घेतला. तेव्हापासून सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय, अभिषेक-ऐश्वर्या जलसा सोडून जाणार का?  अमिताभ-जयापासून ते वेगळं होणार का? पण तसं काहीही होणार नाहीय. दोघंही अमिताभ बच्चन यांना सोडून जाणार नाहीत.

हा नवा फ्लॅट एक गुंतवणूक म्हणून घेतलाय. अभिषेक आपल्या आईशी खूप जवळ आहे. त्यामुळे आईला सोडून दुसरीकडे राहण्याचा विचारही तो करू शकणार नाही. याअगोदर जेव्हा करिष्मा कपूरसोबत त्याचा साखरपुडा झाला तेव्हा करिष्मानं लग्नानंतर वेगळं राहायची अट घातली. त्याचं पर्यवसन ते लग्न मोडण्यात झालं.

शिवाय ऐश्वर्यालाही बिग बी आणि जया बच्चन यांच्याबद्दल जिव्हाळा आहे. अभिषेकचं लग्न झाल्यानंतर जलसा बंगल्याचं रिनोव्हेशन केलं गेलं. बंगल्याचा एक भाग अभिषेक-ऐश्वर्याला दिला. तर दुसऱ्या भागात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन राहतात. बंगल्याची लिव्हिंग रूम एकच आहे. त्यामुळे एकत्र राहून प्रत्येकाची प्रायव्हसी जपली जाते.

एकुणात काय, अभिषेक कितीही फ्लॅट्स विकत घेऊ दे, एकत्र कुटुंबाचा जलसा तसाच राहणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 04:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close