'सैराट'फेम आर्चीला मिळाले 66.40 टक्के, निकाल झाला व्हायरल

'सैराट'फेम आर्चीला मिळाले 66.40 टक्के, निकाल झाला व्हायरल

आज दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर होण्याआधीच सैराटफेम आर्चीचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • Share this:

13 जून : आज दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर होण्याआधीच सैराटफेम आर्चीचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला दहावीत 66.40 टक्के मार्क्स मिळाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

17 नंबरचा फार्म भरून तिने दहावीची परीक्षा दिली होती. पण तिला नेमके किती मार्क्स मिळालेत हे अजून अधिकृतरित्या कळू शकलं नसलं तरी सोशल मीडियाने मात्र, त्याआधीच आर्चीचा निकाल व्हायरल करून टाकलाय.

दरम्यान, नववीत आर्चीला 81.06 टक्के मिळाले होते. पण कन्नड सैराटच्या शूटिंगमुळे तिला दहावीत नियमितपणे शाळेत जाता आलं म्हणून तिने बाहेरूनच दहावीची परीक्षा दिली होती. सैराट रिलीज झाला तेव्हा तिने डॉक्टर व्हायची इच्छा व्यक्त केली होती.

आर्चीची गुणपत्रिका

500 पैकी 327

Loading...

मराठी - 83

हिंदी   - 87

इंग्रजी - 59

गणित - 48

सायन्स - 42

सोशल सायन्स - 50

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...