मुंबई, 11 नोव्हेंबर : 'द कपिल शर्मा' शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूच्या जागी आलेली अभिनेत्री अर्चना पूरन सिंहनं देखील प्रेक्षकांना तेवढंच हसत ठेवलं. यावेळी अर्चना प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांच्याशी अनेक मजेदार अनुभव सुद्धा शेअर करते. नुकताच तिनं या शोमध्ये एक मोठा खुलासा केला आहे. अर्चनानं तिच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा कपिल शर्मा शोमध्ये शेअर केला आहे.
अर्चना आणि तिचा पती परमीत यामुळे सध्या खूप चर्चेत आले आहेत. अर्चनाने सांगितलं, एकदा रात्री उशीरा कारमध्ये रोमान्स करताना तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी पकडलं होतं. अर्चनाने हा किस्सा 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितलं. एका रात्री ती आणि परमीत रात्री उशीरा कारमध्ये रोमान्स करत होते. त्यावेळी अचानक पोलिसानी त्यांच्या कारची काच ठोठावली आणि त्यांना रंगेहात पकडलं होतं.
मैत्रिणीच्या लग्नात डान्स करून बिघडली दीपिकाची तब्येत, पाहा कशी झाली अवस्था
अर्चना सांगतात, 'त्यावेळी मी खूप घाबरले होते. काय करावं हे मला समजत नव्हतं. पोलिसांना आम्ही आमचं लग्न झाल्याचंही सांगितलं'. अर्चना पुढे म्हणाल्या, ' हे खरं तर खूप रिस्की होतं पण बाहेर पाऊस सुरू असताना कारमध्ये रोमान्स करणं मला आवडतं.' द कपिल शर्मा शोमध्ये सिद्धूच्या जागा अर्चनानं घेतली. सुरुवातीला यामुळे शोच्या टीआरपीवर परिणाम होईल असं बोललं जात होतं मात्र अर्चनाच्या येण्यानं या शोच्या टीआरपीमध्ये कोणताही फरक पडला नाही.
जखमी अवस्थेतही ऐश्वर्यानं डान्स न थांबवता पूर्ण केलं शूटिंग!
अर्चना आणि परमीत यांची लव्ह स्टोरी एका इव्हेंटमधून सुरू झाली. आयबी टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार पहिलं लग्न तुटल्यानंतर आर्चनाला कोणत्याही नात्यात अडकायचं नव्हतं. पण परमीतला भेटल्यानंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली आणि अखेर दोघंही लग्नाच्या बंधनात अडकले. प्रेमात पडल्यानंतर सुरुवातीला या दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. काही काळ एकत्र राहिल्यानंतर या दोघांनीही 30 जून 1992 मध्ये लग्न केलं.
VIDEO : रेड ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलानं केला HOT डान्स, चाहते म्हणाले...
================================================================
नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा