Home /News /entertainment /

द कपिल शर्मा शो खरचं बंद होणार का ? शो बंद होण्यापूर्वीचं अभिनेत्रील मिळाली मोठी ऑफर

द कपिल शर्मा शो खरचं बंद होणार का ? शो बंद होण्यापूर्वीचं अभिनेत्रील मिळाली मोठी ऑफर

'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. अशातच शो बंद होण्यापूर्वीच शोच्या परीक्षक अर्चना पूरन सिंह यांना देखील एक मोठी ऑफर मिळाल्याचे समोर आलं आहे.

  मुंबई, 12 मे- Archana Puran Singh: गेल्या काही वर्षात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात 'द कपिल शर्मा शो' चा डंका वाजला आहे. घराघरात हा कार्यक्रम आवर्जून पाहिला जातो. मागच्या काही दिवसांपासून कपिल शर्मा (the kapil sharma show news)त्याच्या संपूर्ण टीमसोबत यूएस टूरवर जाण्याची चर्चा आहे. आता 'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार ( the kapil sharma show going off air ) असल्याची चर्चा आहे. अशातच शो बंद होण्यापूर्वीच शोच्या परीक्षक अर्चना पूरन सिंह यांना देखील एक मोठी ऑफर मिळाल्याचे समोर आलं आहे. या शोमध्ये दिसणार लवकरच अर्चना पूरन सिंह Bollywoodlife नं दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच अर्चना पूरन सिंह शो 'इंडियाज लाफ्टर चॅलेंज' हा रिअॅलिटी शो जज करताना दिसणार आहे. या शोमध्ये देशभरातील स्टॅंजअप कॉमेडियन सहभागी होणार आहेत. अशी चर्चा आहे की, हा शो काहीसा 'द ग्रेट इंडियन लाफ्टर' यासारखाच असणार आहे. वाचा-'हा किती मोठा अभिनेता आहे हे अख्या जगाला..' समीर चौगुलेंची पॅडी कांबळेसाठी पोस्ट हा अभिनेता देखील दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना पूरन सिंहसोबत लोकप्रिय अभिनेते शेखर सुमन देखील या शोच्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र अद्याप यावर अर्चना पूरन सिंह यांनी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र अर्चनाने इन्स्टाला या शोचा एक प्रोमो व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामुळं विविध चर्चा रंगल्या आहेत.
  'द कपिल शर्मा शो' साठी एवढी फी घेतात अर्चना पूरन सिंह अर्चना पूरन सिंह 'द कपिल शर्मा शो' शो जज करताना दिसतात. अनेकवेळा कपिल शर्मा अर्चना पूरन सिंहला शोसाठी घेण्यात येणाऱ्या मानधनावरून कॉमेडी अंदाजात सुनावताना दिसतात. रिपोर्टनुसार अर्चना एका भागासाठी 10 लाख रूपये घेते. तर कपिल शर्मा एका भागासाठी 50 लाख घेतो. भारती सिंग एका भागासाठी 10 ते 12 लाख व , कृष्णा अभिषेक देखील 10 ते 12 लाख रुपये घेतो.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, The kapil sharma show, Tv shows

  पुढील बातम्या