मुंबई, 07 जून : मल्याळम अभिनेत्री अर्चना कवि एक भयंकर कार अपघातातून थोडक्यात वाचली. अर्चनाची कार कोच्चि एअरपोर्टला जात असताना तिच्या कारवर एक कंक्रीट स्लॅब कोसळल्यानं हा अपघात झाला. या अपघाताचे काही फोटो ट्विटरवर शेअर करत अर्चनानं या अपघाताची माहिती दिली. या वेळी तिनं या ट्वीटमध्ये कोच्चि पोलिस आणि कोच्चि मेट्रो अधिकाऱ्यांना टॅग केलं आहे.
अर्चनानं आपल्या अपघाताबद्दल ट्विटरवर लिहिलं, 'आम्ही थोडक्यात वाचलो. आम्ही कोच्चि एअरपोर्टला जात असताना आमच्या चालत्या कारवर एक कंक्रीट स्लॅब येऊन पडला. मी कोच्चि पालिसांना विनंती करते की, कृपया तुम्ही या अपघाताची योग्य ती चौकशी करावी आणि कार ड्रायव्हरला त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न करा.'
कियारा अडवाणीच्या रिलेशनशीप स्टेटसवर शाहिद कपूरचा मोठा खुलासा
We had a narrow (providential) escape. A concrete slab fell on our moving car while we were on the way to the airport. I would request @kochimetro and @KochiPolice to look into the matter and compensate the driver. Also see to it that such things don't happen in future. pic.twitter.com/knDdqC3bwN
— Archana Kavi (@archana_kavi) June 5, 2019
अर्चनाच्या या पोस्टनंतर कोच्चि रेल्वे अधिकाऱ्यांनी तिच्या ट्वीटला रिप्लाय केला. त्यांनी लिहीलं, डियर अर्चना कवि, तुम्ही दिलेल्या माहितीनंतर आम्ही कार ड्रायव्हरशी संपर्क केला आहे. या दुर्घटनेचं लोकेशन आम्ही शोधत आहोत. याबाबतचे अपडेट आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी आहोत.
मलायकामुळे अर्जुनवर होतेय टीका, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
Dear @archana_kavi following your update, we contacted the driver last evening to understand the whereabouts of the incident. Our team is looking into the issue and will get back to you at the earliest. Extremely regret the inconvenience caused.
— Kochi Metro Rail (@MetroRailKochi) June 6, 2019
सूत्रांच्या माहितीनुसार कोच्चि पोलिस या अपघाताची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर अर्चनाचे चाहते खूप चिंतेत असल्याचं समजतं. तिच्या ट्विटरवरही तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायाला मिळत आहेत. एक चाहत्यानं लिहिलं, हे खूप भीतीदायक आहे. अशा करतो की, तुम्ही सुरक्षित आहात. तर अनेक चाहत्यांनी अर्चनाला तिची काळजी घेण्यास सांगितलं आहे.
अर्चनानं अनेक मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं असून 'नदोदिमानन', 'हनी बी', 'बँगल्स' यासारख्या सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय तिनं तमिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे. ज्यात अरावन आणि नाना किरुक्कन या सिनेमांचा समावेश आहे.
जिमच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाला इम्रान खान, ओळखताही येणं अशक्य