अरबाज खानचं रोमच्या अलेक्झांड्राशी शुभमंगल

अरबाज खानचं रोमच्या अलेक्झांड्राशी शुभमंगल

अलेक्झांड्रा ही मूळची रोमची असून गोव्यात ती एक हॉटेल चालवतेय. अरबाज आणि मलाईकाचा काडीमोड झाल्यानंतर अलेक्झांड्रा बरोबरचे फोटो अरबाजने शेअर केले आहेत.

  • Share this:

25 मे : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलाईका अरोरा खान यांचा घटस्फोट होऊन अवघा एकच आठवडा उलटला आहे. पण त्यानंतर अरबाजने लगेच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी सुरू केलीय. अरबाज त्याची परदेशी मैत्रीण अलेक्झांड्रा हिच्यासोबत लग्न करणारे.

अलेक्झांड्रा ही मूळची रोमची असून गोव्यात ती एक हॉटेल चालवतेय. अरबाज आणि मलाईकाचा काडीमोड झाल्यानंतर अलेक्झांड्रा बरोबरचे फोटो अरबाजने शेअर केले आहेत. सध्या हे दोघे आकंठ प्रेमात बुडाले अाहेत. मलाईकाला मात्र अरबाजच्या या निर्णयामुळे जोरदार झटका बसलाय.

अरबाज आणि मलाईकाचं 18 वर्षांचं सहजीवन संपुष्टात आलं. त्यांचा मुलगा मलाईकासोबत राहतोय. मलाईका अरबाजच्या कुटुंबाशीही खूप अॅटॅच्ड होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 11:39 AM IST

ताज्या बातम्या