सलमानच्या 'दबंग-3' मधून डेब्यू करणार अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया?

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 03:24 PM IST

सलमानच्या 'दबंग-3' मधून डेब्यू करणार अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया?

मुंबई, 20 ऑगस्ट- गेल्या काही दिवसांपासून अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. असंही म्हटलं जात होतं की, इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री दबंग- 3 सिनेमात निर्माता आणि अभिनेता अरबाज खानसोबत दिसणार आहे. जॉर्जियाचा असा काही विचार नसल्याचं किने स्पष्ट केलं. स्वतः जॉर्जियाने तिच्या या बॉलिवूड पदापर्णावरील प्रश्नांना समोरून उत्तरं दिली.

सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर दबंग- 3 सिनेमात ती डान्स नंबर करणार आहे का असा प्रश्न जेव्हा जॉर्जियाला विचारण्यात आला, तेव्हा तिने हे फक्त तर्क लावले जात असल्याचं सांगितलं. जॉर्जिया म्हणाली की, 'मला तो बँड आवडतो आणि अरबाज- सलमानच्या कामाचं मी कौतुक करते. पण मी दबंग- 3 मध्ये कोणताही डान्स किंवा अभिनय करत नाहीये. पण डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.'

एकंदरीत जॉर्जियाच्या चाहत्यांना तिच्या बॉलिवूड एण्ट्रीसाठी काही दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे. मात्र ती तमिळ वेब सीरिज 'Karoline Kamakshi' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजबद्दल बोलताना ती म्हणाली की, 'सीरिज निवडण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे व्यक्तिरेखा. कॅरोलीनच्या व्यक्तिरेखेत त्या सर्व गोष्टी आहेत, ज्या पडद्यावर दाखवणं अवघड आहेत.'

भाषेवर कसं काम केलं याबद्दल सांगताना जॉर्जिया म्हणाली की, यासाठी तिने स्क्रिप्टवर फार मेहनत घेतली शिवाय इतरांकडून भाषेचं ज्ञान घेतलं. जॉर्जियाने तिच्या फॅशन डिझायनिंगबद्दलही चर्चा केली. ती म्हणाली की, 'जेव्हा मी लहान होते तेव्हा वहीत वेगवेगळ्या ड्रेसचे चित्र काढायची. मोठी झाल्यावर मी जॉर्जिया अरमानी (फॅशन डिझायनर) होईन असं आईला नेहमीच सांगायचे.' सध्या जॉर्जिया फक्त तिचेच कपडे डिझाइन करत असून फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिचा अजून दुसरा कोणताही प्लॅन नाही.

Man vs Wild मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला रेकॉर्ड

Loading...

...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...