अरबाज खानचा 'हा' प्रश्न ऐकून रडू लागली सनी लिओन

अरबाजनं या शोच्या शुटींग दरम्यान सनी लिओन सोबत घडलेली एक घटना सांगितली.

  • Share this:

अभिनेता अरबाज खान सध्या 'Pinch By Arbaaz Khan' या त्याच्या नव्या यूट्युब शोमुळे चर्चेत आहे. नुकताच या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये अरबाज बॉलिवूड सेलिब्रेटींना सोशल मीडियावर कमेंट केलेले प्रश्न विचारताना दिसत आहे.

प्रसार माध्यमांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजनं शोच्या फॉरमॅट बद्दल माहिती दिली.

सेलिब्रेटींबद्दल सोशल मीडियावर नेटीझन्स जेव्हा असभ्य भाषेत कमेंट करतात किंवा प्रश्न विचारतात तेव्हा सेलिब्रेटींना नेमकं काय वाटतं. या सर्व गोष्टींना ते कसं सामोरं जातात. हाच या शोचा फॉरमॅट असल्याचं अरबाजनं यावेळी सांगितलं.

अरबाज खान स्वतः या सर्व गोष्टीबद्दल दुःखी आहे. तो सांगतो, करण जोहर पासून ते करीना कपूर पर्यंत ज्या लोकांसोबत काम केलं आहे तो प्रत्येकजण सोशल मीडियावर युजर्सना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे त्रासलेला आहे.

यावेळी अरबाजनं या शोच्या शुटींग दरम्यान सनी लिओन सोबत घडलेली एक घटना सांगितली, आम्ही जेव्हा सनीच्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन आलेल्या कमेंट मधील प्रश्न पाहिले, तेव्हा त्यातील एक प्रश्न एवढा वाईट होता की तो प्रश्न ऐकल्यावर सनी रडू लागली.

अरबाज म्हणतो जर आम्हाला या प्रश्नांवर बोलताना एवढं वाईट वाटतं तर विचार करा कि, सनीवर जेव्हा असभ्य भाषेत खुलेआम टीका केली जाते तेव्हा तिला काय वाटत असेल.

सोशल मीडिया विषयक कायद्यामध्ये काही नियम असावेत ज्यामुळे अशा प्रकारच्या कमेंट करताना लोक सावध राहतील आणि सायबर गुन्हेगारीला आळा बसेल, असं मतही अरबाजनं यावेळी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 09:26 AM IST

ताज्या बातम्या