मलायकाशी घटस्फोट, गर्लफ्रेंड जॉर्जियाशी दुसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर भडकला अरबाज!

मलायकाशी घटस्फोट, गर्लफ्रेंड जॉर्जियाशी दुसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर भडकला अरबाज!

जवळपास 19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूडमध्ये नवी नाती जुळायला आणि जुनी नाती तुटायला फारसा वेळ लागत नाही. आतापर्यंत बरीच वर्ष संसार करुन वेगळ्या झाल्याले अनेक कपल्सची उदाहरण आपल्याला माहित आहेत. असंच एक कपल आहे अरबाज खान आणि मलायका अरोरा. जवळपास 19 वर्षांच्या संसारानंतर 2017 मध्ये हे दोघंही वेगळे झाले. त्यानंतर आता दोघंही त्यांच्या वेगवेगळ्या जोडीदारांसोबत खूश आहेत.

एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर दुसरीकडे अरबाज सुद्धा जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. या दोघांनीही त्यांच्या नात्यांची कबुली तर दिली पण सोबतच लग्नाच्या वृत्ताला नकारही दिला आहे. इतकंच नाही तर नुकतंच एका मुलाखतीत अरबाजला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावर तो नाराज झालेला दिसला.

दीपिकानं सांगितलं गुपित, धोनी नाही तर ‘हा’ आहे आवडता क्रिकेटपटू!

इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजनं त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. सध्या अरबाज त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या दरम्यान दिलेल्या मुलाखतीत जेव्हा त्याला गर्लफ्रेंड जॉर्जियाशी लग्न करण्याच्या चर्चांविषयी विचारण्यात आलावर तो चिडला.

या मुलाखतीत अरबाजनं त्याच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, ‘आम्ही दोघं एकमेकांना डेट करत आहोत याचा अर्थ असा नाही की, आम्ही आत्ताच लग्न करावं. मी विचारतो कोणती सूत्र? माझ्या वडीलांनी हे सांगितलं का, माझ्या आईनं सांगितलं का, माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं, कोणत्या खास मित्रानं हे सांगितलं का? जर यापैकी कोणी सांगितलं नाही तर मग ही सूत्र कोण आहेत.’

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी घेतो फिटनेसची काळजी!

अरबाज पुढे म्हणाला, आम्ही हे नातं एका फ्लोमध्ये पुढे नेऊ इच्छितो. मी या नात्यात खूश आहे. मी जॉर्जियाला डेट करत आहे. मी ही गोष्ट मान्य केली आहे. पण माझ्या लग्नाबद्दल बोलायचं तर जेव्हा मी लग्न करेन त्यावेळी मी सर्वांना निमंत्रण देणार आहे. मी सर्वांना याबद्दल जाहीरपणे सांगेन. मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. पण या दोघांचा मुलगा अरहानसाठी हे दोघं आजाही एकमेकांच्या संपर्कात असतात.

प्रेम… इमोशन्स… बदला… ‘नागिन 4’मध्ये उलगडणार नवी रहस्य, पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: December 13, 2019, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading