S M L

बिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती!

या कार्यक्रमात तिचं वागणं थोडं खटकत असलं तरीही ती कार्यक्रमात रंगत आणेल असं वाटत असतानाच ती बाहेर पडली.

Sonali Deshpande | Updated On: Apr 25, 2018 04:28 PM IST

बिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती!

23 एप्रिल :  कलर्स मराठीवर बिग बाॅस रंगायला लागलाय. या शोमध्ये दर आठवड्याला कोण बाहेर पडतंय याची उत्सुकता असते. मराठी बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासूनच 15 स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. आणि हा स्पर्धक ठरला आरती सोळंकी. खरं तर आरतीने या शोमध्ये सगळ्यांचीच मनं जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात तिचं वागणं थोडं खटकत असलं तरीही ती कार्यक्रमात रंगत आणेल असं वाटत असतानाच ती बाहेर पडली.

बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकरांसोबत पहिला विकेण्डचा डाव रंगला. आरती सोळंकीने स्मिता गोंदकरच्या ओठांवर केलेली एक कमेंट तिला फारच खटकली आणि विकेण्डच्या डावाचं निमित्त साधून तिने आपली नाराजी महेश मांजरेकर यांच्यापुढे मांडली. याचाच परिणाम आरतीला बाहेर पडावं लागलं, हे असू शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 05:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close