टायगर श्रॉफनेही ही बातमी सोशल मीडियावर शेअर करून, '(रहमान) त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाबरोबर काम करायला मिळणं हा सन्मान आहे,' अशी भावना व्यक्त केली आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी टायगरने 'हिरोपंती टू'ची घोषणाही सोशल मीडियावर केली होती. 'माझं पहिलं प्रेम परत आलं आहे. कधीही अनुभवलं नसेल अशी अॅक्शन आणि थ्रिल. तीन डिसेंबरला सिनेमागृहात एकत्र साजरं करू या,' असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. तारा सुतारियानेही इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या या सिनेमातल्या भूमिकेबद्दल सांगितलं होतं. 'नव्या कुटुंबासोबत नवा प्रवास.. हिरोपंती टू' अशी पोस्ट तिने केली होती. यापूर्वी टायगर आणि तारा यांनी स्टुडंट ऑफ दी इयर सिनेमात 2019मध्ये एकत्र काम केलं होतं. प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असलेला टायगर 2014मध्ये सिनेमासृष्टीत आला आणि अॅक्शन (Action Film) या जॉनरमध्ये रममाण होऊन गेला. हिरोपंती सिनेमाचे दिग्दर्शक सब्बीर खान यांनी पूर्वी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं होतं, की 'टायगर हा अॅक्शन डिरेक्टरला आनंद देण्यासारखं काम करतो. जेव्हा दिग्दर्शक काही तरी उत्तम साधण्याचा विचार करतो, तेव्हा तो त्याचं सर्वस्व ओतून प्रयत्न करतो. 'हे मला जमणार नाही,' 'हे अवघड आहे,' 'कोणी तरी बॉडी डबल शोधा किंवा दुसरा काही पर्याय शोधा' अशी कारणं तो देत नाही.'View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tiger Shroff