Home /News /entertainment /

Happy Birthday Apurva Nemlekar: अभिनेत्री ते उद्योजिका 'शेवंता'चा थक्क करणारा प्रवास

Happy Birthday Apurva Nemlekar: अभिनेत्री ते उद्योजिका 'शेवंता'चा थक्क करणारा प्रवास

आपली लाडकी शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ तिने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. जाणून घेऊया अपूर्वाबद्दल काही खास गोष्टी

  मुंबई, 27 डिसेंबर: आपला उत्कृष्ठ अभिनय, बोल्ड लूक आणि मादक अदांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar). अपूर्वा नेमळेकर आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या अपूर्वा झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. यात तिच्या भूमिकेचं नाव पम्मी आहे. अपूर्वाच्या घरी वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन झालं. तिने वाढदिवासच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. अपूर्वाला तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. झी मराठीवरील आभास हा या मालिकेतून तिने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. अपूर्वाने तू माझा सांगाती, आराधना, तू जीवाला गुंतवावे, प्रेम या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. अपूर्वाने नाटक क्षेत्रात आणि चित्रपटातही आपलं नाव गाजवलं आहे. अपूर्वा उत्तम अभिनी आहेच पण ती स्वत: एक उद्योजिकादेखील आहे. 2015 साली अपूर्वाने तिच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड बाजारात उतरवला होता. अपूर्वा कलेक्शन असं तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. अभिनयासारख्या व्यस्त ठेवणाऱ्या करिअरमधून वेळ काढत अपूर्वाने उद्योग क्षेत्रात उतरणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
  रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) ही मालिका सुपरहिट ठरली होती. त्यातलं शेवंता (Shevnta) हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमध्ये अपूर्वा खलनायिकेच्या भूमिकेत होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. शेवंताची अदा, तिची बोलण्याची पद्धत सारं काही प्रेक्षकांना घायाळ करणारं होतं.
  अपूर्वा नेमळेकरने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेआधी अनेक सीरिअल आणि सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण तिला खरी ओळख 'शेवंता'च्या भूमिकेने दिली. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने विशेष मेहनत घेतली होती. तिला वजन वाढवावं लागलं होतं. तसंच शेवंताच्या भूमिकेसाठी अपेक्षित असलेला ठसका तिला आत्मसात करावा लागला होता.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Marathi entertainment, Serial

  पुढील बातम्या