मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO : साताऱ्याच्या बच्चनच्या भेटीसाठी अपूर्वा थेट साताऱ्यात, किरण मानेची अशी होती रिअॅक्शन

VIDEO : साताऱ्याच्या बच्चनच्या भेटीसाठी अपूर्वा थेट साताऱ्यात, किरण मानेची अशी होती रिअॅक्शन

साताऱ्याच्या बच्चनच्या भेटीसाठी अपूर्वा थेट साताऱ्यात

साताऱ्याच्या बच्चनच्या भेटीसाठी अपूर्वा थेट साताऱ्यात

बिग बॉस मराठीच्या घरात एक अशी जोडी होती ती सतत चर्चेत तर होतीच पण घरात असताना एकमेकांचे तोंड देखील पाहायला तयार नव्हती. पण कालांतराने या दोघांच्यात मैत्री झाली. घरातून बाहेर आल्यानंतर ही जोडी आता एकमेंकाना भेटताना दिसते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च- बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीजन तुफान गाजला. या सीजनचा विजेता अक्षय केळकर झाला. विजेता अक्षय केळकर झाला असला तरी या घरातील असे काही स्पर्धक आहेत जे प्रेक्षकांच्या आजही मनात आहेत. या घरात एक अशी जोडी होती ती सतत चर्चेत तर होतीच पण घरात असताना एकमेकांचे तोंड देखील पाहायला तयार नव्हती. पण कालांतराने या दोघांच्यात मैत्री झाली. घरातून बाहेर आल्यानंतर ही जोडी आता एकमेंकाना भेटताना दिसते. ही जोडी दुसरी तिसरी कोणाची नसून अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांची आहे.

अपूर्वा नेमळेकर नुकतीच साताऱ्यात आली होती. सातारा म्हटलं की सातारचा बच्चन किरण माने आलाच. तिनं यावेळी किरण मानेची खास भेट घेतली शिवाय त्याच्यासोबतचा एक खास व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या  किरण मानेनं हा  व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,बिगबाॅसमधली सगळ्यात चर्चेत राहिलेली जोडी एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच भावा ! सातारा दणाणून निघणारंय आज. चिखलात धुरळा पान्यात आग लागनारंय... 'रावरंभा'चं प्रमोशन सुरू झालंय... त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील आनंदात आहेत.

या व्हिडिओ मध्ये अपूर्वा म्हणते, 'हॅलो मि तुमची लाडकी अपूर्वा नेमळेकर.. माझ्या आगामी ‘रावरंभा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी साताऱ्यात आले आहे. आता सातारा म्हंटल्यावर एक व्यक्तीला भेटायलाच हवं ते म्हणजे .. किरण्या.. त्यानंतर किरण माने व्हिडिओ मध्ये येतो सर्वांना नमस्कार करतो. त्यावेळी अपूर्वा म्हणजे किरण काय म्हणशील.. त्यावर किरण अपूर्वासाठी एक खास शेर अर्ज करतो. तो म्हणतो, 'माना की हमारी शख्सियत जुदा है.. पर इन हेजल आखों पण ये नट फिदा है.. '

यावेळी दोघेही हसतात आणि अपूर्वा म्हणजे पहा हा सातारचा बच्चन आणि किरण म्हणतो पहा ही दादारची शेरणी.. त्यांचा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.अपूर्वा नेमळकर लवकरच 'रावरंभा' या ऐतिहासिक मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अपूर्वा सध्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सगळीकडे भेट देत आहे. याच प्रमोशनसाठी अपूर्वा साताऱ्यात गेली होती. त्यावेळीचा हा व्हिडिओ आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अपूर्वा असेल किंवा किरण माने नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment