मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मराठी सीरियलचा पॅटर्न OUT OF THE BOX होतोय?'; अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

'मराठी सीरियलचा पॅटर्न OUT OF THE BOX होतोय?'; अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

रोहित परशुराम आप्पी आमची कलेक्टर

रोहित परशुराम आप्पी आमची कलेक्टर

अप्पी आमची कलेक्टर म्हणजे OUT OF THE BOX थिंकिंगचा एक उत्तम नमुना आहे, असं म्हणत अभिनेत्यानं मराठी सीरियलचा पॅटर्न OUT OF THE BOX होतोय असल्याचं वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  24 सप्टेंबर :  टेलिव्हिजनवर मोठ्या संख्येनं मालिका पाहिल्या जातात. प्रत्येक घरात संध्याकाळी मराठी मालिकांचा बोलबाला पाहायला मिळतो. मालिका या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. मालिकेच्या कथा प्रत्येक घरात काही प्रमाणात मिळत्या जुळच्या ठरतात. पण मधल्या काही काळात मराठी मालिकांचं बदललेलं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सासू सुरांच्या रोजच्या कटकटींनी देखील वेगळंच रुप घेतलेलं पाहायला मिळतं. वाहिन्यांनी टीआरपीच्या खेळात मालिकांचा दर्जा खालावल्याचा आरोपही अनेकवेळा केला गेला आहे.  प्रत्येक मालिकेचं कथानक आधीच्या मालिकेप्रमाणेचं भासतं. सगळ्या स्टोरी सारख्या वाटतात. अशातच आता मराठी मालिकांचा पॅटर्न ऑउट ऑफ द बॉक्स होत असल्याचं मोठं वक्तव्य एका अभिनेत्यानं केलं आहे. सध्या या अभिनेत्याची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

झी मराठीवर नुकतीच सुरू झालेली आप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.  आप्पी आणि शेहनशाहची जोडी हिट होईल असं वाटतं आहे. मालिकेत सध्या सतत आप्पीला मदत करणारा शेहनशाहा नक्की कोण आहे हे कळणार आहे. शेहनशाहचा खरा चेहरा आप्पीसमोर येणार आहे. मालिकेतील या भागात शुटींग फार खास पद्धतीनं करण्यात आलं आहे. आप्पी आणि शेहनशाहची भेट अनोख्या पद्धतीनं दाखवण्यात येणार आहे. याच सीनच्या निमित्तानं मालिकेतील शेहनशहा म्हणजेच अर्जुन अर्थात अभिनेता रोहित परशुराम यानं खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा - Aai Kuthe Kay karte : आई कुठे काय करते मालिकेचं नाव बदला; प्रेक्षकांचा सल्ला, तुम्हीही व्हाल शॉक

रोहितनं त्याच्या आयुष्यातील आऊट 'ऑफ द बॉक्स' ही संकल्पना मांडत खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं म्हटलंय, 'अप्पी आमची कलेक्टर म्हणजे OUT OF THE BOX थिंकिंगचा एक उत्तम नमुना आहे हे मी एक अभिनेता म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणून पण तेवढ्याच कॉन्फिडेन्टली सांगू शकतो. ह्यात दाखवला जाणारा प्रत्येक सीन हा ज्या थॉट प्रोसेसनं शूट केला जातो ती प्रोसेस म्हणजे आऊट ऑफ द बॉक्स आहे हे मला कळून चुकलंय'.

रोहितनं पुढे म्हटलंय, 'तुम्ही सगळे जण ज्या सीनची आतुरतेने वाट बघत होतात तो सीन  हो....आज अप्पी आणि शहेनशाह समोरासमोर येतायेत. हा सीन पाहिल्यावर "मराठी सीरियलचा पॅटर्न आता OUT OF THE BOX होत चाललाय बरं का" अशी तुमची प्रतिक्रिया आली तर जिंकलो आम्ही !'.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial