सार्वजनिक शौचालय शोधणारा अॅप बनवावा,अक्षयचा राज्य सरकारला सल्ला

सार्वजनिक शौचालय शोधणारा अॅप बनवावा,अक्षयचा राज्य सरकारला सल्ला

"महाराष्ट्र सरकारने जुन्या STD/ISD टेलिफोन बूथप्रमाणे ठिकठिकाणी टॉयलेट्स बनवावे आणि ते लोकेट करण्यासाठी एक टॉयलेट अॅप बनवावा"

  • Share this:

01 मे : महाराष्ट्र सरकारने जुन्या STD/ISD टेलिफोन बूथप्रमाणे ठिकठिकाणी टॉयलेट्स बनवावे आणि ते लोकेट करण्यासाठी एक 'टॉयलेट अॅप' बनवावा अशी सूचनावजा मागणी अभिनेता अक्षयकुमार याने राज्य सरकारकडे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या सूचनेचं स्वागत केलं असून लवकरच शासनाकडून हा विचार आमलात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली.

महाराष्ट्रदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षयकुमारची उपस्थिती होती. यावेळी हागणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी अक्षयकुमारनं ठिकठिकाणी STD/ISD टेलिफोन बूथ प्रमाणे टाॅयलेट उभारण्याची मोलाची सूचनाही केली. तसंच  ते लोकेट करण्यासाठी एक टॉयलेट अॅप बनवावे ज्यामुळे लोकांना त्याची माहिती होईल आणि जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करू शकतील असंही अक्षय म्हणाला.

इतकंच नाही तर अक्षय कुमारने 'टॉयलेट - एक प्रेमकथा' नावाचा सिनेमा करत असल्याचा खुलासा केला. त्यामधला "अगर बिवी पास चाहिए तो घर में संडास चाहिए" हा डायलॉग सुद्धा बोलून दाखवला आणि उपास्थितांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

घरात शौचालय असावं म्हणून एका महिलेने घटस्फोट मागितला. त्या महिलेचं उदाहरण देत अक्षयने त्या महिलेचं कौतुक केलं आणि प्रत्येक पुरुषाला आवाहन केलं की, लग्न करायचं असेल तर घरी शौचालय असेलच पाहिजे असं आवाहनही अक्षयने केलं.

First published: May 1, 2017, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading