अपारशक्तीच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. भूमी पेडणेकर, सान्या मल्होत्रा, शक्ती मोहन यांनी अपारशक्ती आणि आकृतीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मात्र एका खास व्यक्तीने देखील ही आनंदाची बातमी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली असून ही सगळ्यात भारी feeling असल्याचं त्याने म्हटलं आहे. अपारशक्तीचा भाऊ अर्थात बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाने त्याच्या पुतणीचं कुटुंबात स्वागत केलं आहे. अपारशक्तीची पोस्ट इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करत त्याने Arzoie चं स्वागत केलं आहं. आयुष्मानने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, 'कुटुंबात आणखी एक सदस्य, बेस्ट फीलिंग!'View this post on Instagram
सध्या अपारशक्ती त्याचा 'हेल्मेट' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा रोहन शंकर यांनी लिहिलेला असून सतराम रमानी यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor