मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Anvita Phaltankar च्या डान्सचा जलवा; स्वीटूने हुकस्टेप चॅलेंजमध्ये केली कमाल, VIDEO VIRAL

Anvita Phaltankar च्या डान्सचा जलवा; स्वीटूने हुकस्टेप चॅलेंजमध्ये केली कमाल, VIDEO VIRAL

अन्विता फलटणकरनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या गाण्यांच्या हुकस्टेप करताना दिसत आहे.

अन्विता फलटणकरनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या गाण्यांच्या हुकस्टेप करताना दिसत आहे.

अन्विता फलटणकरनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या गाण्यांच्या हुकस्टेप करताना दिसत आहे.

    मुंबई, 9 ऑगस्ट : 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील स्वीटू म्हणून अभिनेत्री अन्विता फलटणकरनं (Anvita Phaltankar)ओळख आहे. तीनं स्वीटूच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अन्विता ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून अन्विता तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अन्वितानं नुकताच शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वीटूच्या म्हणजेच अन्विताच्या डान्सचा जलवा पहायला मिळतोय. अन्वितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या गाण्यांच्या हुकस्टेप करताना दिसत आहे. गाणं वाजलं की ती गाण्याची फेमस स्टेप म्हणजेच हुकस्टेप करताना दिसतेय. तिचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही पहायला मिळत आहे. 'तू फक्त हावभाव दिले तरी एकदम छान वाटतंय, तू सुंदर डान्स करतेस, स्वीटू मस्तच, डान्सिंग क्वीन', अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते व्हिडीओवर करत आहे.
    अन्विता तिच्या बिनधास्त स्टाईल, कुल अंदाज, विनोदी शैलीमुळे कायम चर्चेत असते. अन्विताचा मस्तीखोर अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या प्रेमात पाडतो. अन्विता नुकताच प्रदर्शित झालेल्या टाईमपास 3 चित्रपटामुळे चर्चेत आली होती. अन्विताला मोठ्या पडद्यावर पाहून तिचे चाहते खूप आनंदी आहेत. अन्विता फलटणकरनं 'टाईमपास 3'मध्ये चंदाची भूमिका साकारलेली पहायला मिळाली. अन्विताची सिनेमातील भूमिका कशी असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र तिनं साकारलेलं चंदाचं पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं. हेही वाचा -  Sahkutumb Sahaparivar : सहकुटुंब सहपरिवार मालिकेत दिसणार भावांमधील प्रेम; पशा सूर्याला देणार जीवनदान दरम्यान, छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमकारच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिकंली. अन्विताचे लाखो चाहते आहेत. तिला स्वीटू या भूमिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली आहे.
    First published:

    Tags: Dance video, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment, TV serials

    पुढील बातम्या