Anvita Phaltankar Birthday: अन्विताला आवडत नाही 15 जून ही तारीख; काय नेमकं कारण?
Anvita Phaltankar Birthday: अन्विताला आवडत नाही 15 जून ही तारीख; काय नेमकं कारण?
(yeu kashi tashi mi nandayala) येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू (sweetu) म्हणजेच अन्विता फलटणकरसाठी 15 जून हा दिवस कायमच वाईट होता. यामागे नेमकं कारण काय होतं?
मुंबई 1 जुलै: मराठीमधील एक गोड आणि हसतमुख अभिनेत्री म्हणून (Anvita Phaltankar) अन्विता फलटणकर कडे पाहिलं जातं. अन्वितचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांची लाडकी स्वीटू पंचविसाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. अन्विता कायमच दिलखुलास म्हणूनच ओळखली जाते. पण सगळ्यांच्या लाडक्या स्वीटूला मात्र एक गोस्ट अजिबात आवडत नाही. काय आहे ती गोष्ट?
अन्विता कायम बिनधास्त आणि कूल अंदाजात असते. आजच्या काळातली ही यंग आणि स्वीट अभिनेत्री कधीच मरगळलेली दिसत नाही. मुंबईत लहानाची मोठी झालेली अन्विता मुंबईशी एक घट्ट बॉण्ड शेअर करते असं असूनही मुंबईच्या धो धो पडणाऱ्या पावसाबद्दल तिला विशेष आकर्षण नाहीये असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.
राजश्री मराठीच्या एका मुलाखतीत ती म्हणते, “मला बदाबदा पाऊस पडत असताना बाहेर पडायला, कामावर जायला अजिबात आवडत नाही. पावसात बाहेर पडणं हे मला पटत नाही. विशेषतः 15 जून हा दिवस मला कधीच आवडला नाही. कारण त्या दिवशी भर पावसात शाळेत जावं लागायचं. आणि ते ओसंडून वाहणारे रस्ते, चिखलाने भरलेले खड्डे मला अजिबात आवडत नसत. त्या चिखलात हमखास पाय पडून बूट खराब होणं हे तर वाईट स्वप्नाहून सुद्धा वाईट. शाळेत हमखास कोणीतरी भिजून यायचं, सगळं ओलं ओलं असतं त्याचा वर्गात वास पसरायचा अशी माझी पावसाची आठवण आहे. मला घरात बसून पाऊस बघायला आवडतो. पावसात चहा आणि मॅगी असा माझा प्लॅन असतो. मी माझ्या एका प्रदेशात राहणाऱ्या मित्रासोबत हा प्लॅन कायम अमलात आणते.”
अन्विता आणि मालिकेतील ओम पात्र साकारणारा शाल्व मिळून सेटवर बराच दंगा करायचे, मजा करायचे हे अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा दिसून आलं आहे. आज एवढे दिवस झाले तरी या मालिकेला कोणी विसरू शकलं नाहीये. या मालिकेच्या आणि स्वीटू ओम च्या तमाम फॅनपेजने त्यांना वारंवार ही मालिका पुन्हा सुरु करा अशी विनवणी सुद्धा केली आहे.
अन्विताने गर्ल्स नावाच्या चित्रपटात काम केलं आहे. अन्विता येत्या काळात कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसेल याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.