Home /News /entertainment /

अनुष्काने बाहुबली 'प्रभास'ला दिला काळजी घेण्याचा सल्ला

अनुष्काने बाहुबली 'प्रभास'ला दिला काळजी घेण्याचा सल्ला

बाहुबली या सिनेमाच्या यशामुळे प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी प्रचंड गाजली. मध्यंतरी या दोघांचं अफेअर सुरू असल्याच्या बातम्याही आल्या होत्या पण नंतर त्यात फारसं तथ्य नसल्याचं समोर आलं.

05 मे : बाहुबली या सिनेमाच्या यशामुळे प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी प्रचंड गाजली. मध्यंतरी या दोघांचं अफेअर सुरू असल्याच्या बातम्याही आल्या होत्या पण नंतर त्यात फारसं तथ्य नसल्याचं समोर आलं. नुकतीच अनुष्काने प्रभासच्या आगामी सिनेमाच्या सेटवर जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी तीने त्याला जपून स्टंट्स करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांपूर्वीच प्रभास अॅक्शन सीन्स करताना जखमी झाला होता. त्यामुळे स्टंट्स करताना बॉडी डबल वापरण्याचा सल्ला अनुष्काने प्रभासला दिला. आता प्रभास अनुष्काचं म्हणणं ऐकतो का याकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलंय. काही दिवसांपूर्वीच 'साहो'च्या सेटवरून प्रभासचा एक फोटो लिक झाला होता. ज्यामध्ये तो एका स्टायलिश काळ्या रंगाच्या बाईकवर बसलेला दिसत होता. असे सांगितले जाते की, प्रभासला काही काळापूर्वीच अ‍ॅक्शन स्टंट करताना गंभीर दुखापत झाली होती. मात्र अशातही त्याने काही स्टंट्स केले होते. परंतु जेव्हा ही बाब त्याची खास मैत्रीण अभिनेत्री अनुष्का शेट्टीला कळाली तेव्हा ती लगेचच प्रभासला भेटण्यासाठी 'साहो'च्या सेटवर पोहोचली होती. यावेळी अनुष्काने प्रभासला सल्ला दिला होता की, 'चित्रपटातील सर्वच स्टंट स्वत: करण्याचा हट्ट करू नये. ज्याठिकाणी गरज आहे, तिथे बॉडी डबलचा आधार घ्यायला हवा. जास्त भयानय स्टंट्स तुझ्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतात.'
First published:

Tags: Bahubali, Prabhas

पुढील बातम्या