अनुष्का करिअरच्या सुरुवातीला घेत होती अशी मेहनत; जूना व्हिडीओ व्हायरल

अनुष्का करिअरच्या सुरुवातीला घेत होती अशी मेहनत; जूना व्हिडीओ व्हायरल

अॅक्टींग स्कूलचा अनुष्काचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. अभिनयाचे धडे घेताना अनुष्काने कठोर मेहनत घेतली होती.

  • Share this:

मुंबई 20 जून: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये येते. पण करिअरच्या सुरुवातीला तिनेही अनेक पापड लाटल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच अनुष्काने तिच्या नाट्यशाळेत कठोर मेहनत घेतली होती. त्याचाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. जेव्हा अनुष्का अॅक्टींग स्कूलमध्ये अभिनयाचे धडे घेत होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

अनुष्काने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांवर छाप सोडली होती. अभिनेता शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) तिने ‘रबने बना दी जोडी’ या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली होती. दमदार अभिनयामुळेच अनुष्काला पहिलाच ब्रेक फार मोठा मिळाला होता. अनुष्काने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी जोमाने मेहनत घ्यायाला सुरूवात केली होती आणि तेव्हाच तिने अभिनयाचे धडेही घेतले होते. तेव्हाचा एक व्हिडीओ सध्या हिट ठरत आहे.

Father’s Day 2021: हे आहेत बॉलिवूडचे सिंगल फादर; निभावतात आई-बाबा दोन्ही भूमिका

या व्हिडीओत अनुष्का रडताना एक सीन करत आहे. तर सोबत तिचे इतर सहकारी देखील आहेत. हा अनेक वर्ष जूना व्हिडीओ असला तरीही तिच्या चाहत्यांना मात्र तो फारचं आवडला आहे. अनेकांनी अनुष्काचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिच्या अभिनयाला दमदार म्हटलं आहे. दरम्यान अनुष्काने बॉलिवूडमध्ये स्वतः तिचं स्थान निर्माण केलं आहे. तर ती कोणत्याही फिल्मी पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आली होती.

यांनतर अनुष्काने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं व करिअरला उभारी दिली. फक्त अभिनयचं नाही तर ती आता एक प्रोड्युसर, एक उद्योजिका देखील आहे. तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. तर एक क्लॉथिंग ब्रँडही आहे. अनेक चित्रपट तिच्या प्रोडक्शन मार्फत निर्माण करण्यात आले आहे. मागील वर्षी पाताळ लोक ही सीरिज हिट ठरली होती. तर आता काला या चित्रपटाची निर्मिती ती करत आहे.

अनुष्का काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. तर पती विराटसोबत (Virat Kohali) आणि मुलगी वामिकासोबत (Vamika) ती सध्या लंडनमध्ये आहे. विराट त्याच्या मॅचेसमध्ये व्यस्त आहे. पण अनुष्का तिथे मुलीसोबत वेळ घालतवताना दिसत आहे. सोशल मीडियावर ती फोटो पोस्ट करत असते.

Published by: News Digital
First published: June 20, 2021, 11:59 AM IST

ताज्या बातम्या