Home /News /entertainment /

विराटने सांगितली अनुष्काची डिलिव्हरी डेट; 'या' दिवशी नवा पाहुण्याचं आगमन होण्याची शक्यता

विराटने सांगितली अनुष्काची डिलिव्हरी डेट; 'या' दिवशी नवा पाहुण्याचं आगमन होण्याची शक्यता

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma)च्या बाळाची आगमनाची तारीख विराटने सांगितली आहे. ही बातमी ऐकून त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे.

    मुंबई, 19 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिचा प्रेग्नसीचा वेळ खूप आनंदात घातवताना दिसत आहे. पण विराट कोहली (Virat Kohli) सध्या आयपीएल (IPL)मध्ये फारच व्यस्त आहे. अशातच विराटचा धीर वाढवण्यासाठी अनुष्काही त्याची मॅच बघायला जात असते. शनिवारी RCB आणि RRमध्ये  झालेली मॅच पाहण्यासाठी अनुष्काही गेली होती. तिचा स्टेडियमवरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनुष्काचा बेबी बंप दिसून येत आहे. विराटने अनुष्काची डिलिव्हरी डेट सांगितली सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराट आणि अनुष्काचा एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी त्याने 'बेबी डेट 10 नोव्हेंबर' असं देखील लिहलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)च्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनलवर मुलाखत देत असताना विराट कोहलीने 10 नोव्हेंबरला बाळाचा जन्म होण्याची शक्यता आहे असं सांगितलं. विरल भयानीने ही माहिती स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली. पण डेट शेअर केलेला फोटो अवघ्या 2 मिनिटांतच काढून टाकण्यात आला. विराट आणि अनुष्काच्या बाळाच्या जन्माची तारीख वाचून अवघ्या 2 मिनिटांत त्या पोस्टला 1627 लाइक्स आले होते. अनेकांनी त्यावर कॉमेंट्सही केल्या होत्या. पुढच्याच महिन्यात विराटच्या घरातून बाळाचं ट्याहा ट्याहा ऐकायला मिळणार आहे. हे वाचून दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    पुढील बातम्या