मुंबई, 2 ऑक्टोबर : अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चत असते. अनुष्काला मुलगी झाल्यापासून ती वामिकासोबत अनेकवेळा चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर अनुष्काचे आणि वामिकाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच अनुष्काचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती मस्ती करताना दिसत आहे.
अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती एका स्लाइडवर स्विंग करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत अनुष्काने लिहिले की, 'मी माझ्या मुलीसोबत प्ले डेटवर गेले होते आणि मी खूप बालिशपणा केला'. व्हिडीओमध्ये अनुष्का मजेत धावत स्लाइडकडे जाते आणि नंतर स्लाइडवरून सरकत खाली येते. तिचा आनंद पाहून असे वाटते की ती वामिकासोबत खूप मजा करत आहे.
View this post on Instagram
अनुष्काच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप पसंत पडल्याचं दिसत आहे. व्हिडाीओ शेअर केल्यानंतर लगेचच त्याला भरपूर लाईक्स मिळाले आहेत. अनुष्कानं अद्याप वामिकाचा चेहरा कोणाला दाखवला नाहीये. त्यामुळे चाहते वामिकाला पाहण्यासाठी खूप उत्सूक आहेत. कधी एकदा तिचा चेहरा दाखवणार या प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान, अनुष्का लवकरच 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित या चित्रपटात अनुष्का भारतीय क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Bollywood, Bollywood News