अनुष्का शर्माशी गप्पा मारायच्यात? मादाम तुसाँला भेट द्या

अनुष्का शर्माशी गप्पा मारायच्यात? मादाम तुसाँला भेट द्या

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा चक्क बोलका पुतळा सिंगापुरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणारे. हा पुतळा संग्रहालयात येणाऱ्या चाहत्यांशी गप्पाही मारणारे. अशा प्रकारचा बोलका पुतळा असणारी अनुष्का बॉलिवूडची पहिलीच अभिनेत्री असेल.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा चक्क बोलका पुतळा सिंगापुरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणारे. हा पुतळा संग्रहालयात येणाऱ्या चाहत्यांशी गप्पाही मारणारे. अशा प्रकारचा बोलका पुतळा असणारी अनुष्का बॉलिवूडची पहिलीच अभिनेत्री असेल. सेल्फीसाठी हातात मोबाईल घेतलेल्या लूकमध्ये हा पुतळा तयार करण्यात येणार असून सेल्फीसाठी जवळ येणाऱ्या चाहत्यांशी तो संवाद साधेल.

हेही वाचा

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

मुंबईला पोहचताच शाहरुखने सर्वात आधी घेतली 'तिची' भेट !

बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?

सिंगापूरच्या मादाम तुसाँमध्ये बोलणारा भारतीय कलाकाराचा अशा प्रकारचा पहिलाच पुतळा आहे. याआधी स्पायडर मॅन आणि आयर्न मॅन यांचाही पुतळा असाच बोलका आहे. मादाम तुसाँच्या प्रतिनिधीनं सांगितलं की ज्या व्यक्तींचे जगभरात जास्त फॅन्स आहेत, त्यांचे असे बोलके पुतळे बसवतात.

अनुष्कासोबत ज्यांना सेल्फी काढायचीय, त्यांना तिच्या हातातला फोन घेऊन नक्कीच सेल्फी काढता येईल.

अनुष्काच्या या बोलक्या पुतळ्यामुळे मादाम तुसाँमधली गर्दी वाढेल, अशी खात्री तिथल्या संचालकांना आहे.  अनुष्का सध्या झिरो आणि सुईधागा या दोन सिनेमांमध्ये बिझी आहे. संजू सिनेमातही तिची महत्त्वाची भूमिका होतीच.

First published: July 12, 2018, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading