रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यानं अनुष्काला काय दिलं प्रत्युत्तर?

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यानं अनुष्काला काय दिलं प्रत्युत्तर?

हा तरुण कारमधून रस्त्यावर कचरा फेकत होता, त्याला पाहताच कार थांबवून "तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकताय, यापुढे लक्षात ठेवा रस्त्यावर असा कचरा फेकू नका" असं अनुष्काने सुनावलंय. आता त्याच तरुणानं फेसबुकवरून याला उत्तर दिलंय.

  • Share this:

मुंबई, 17 जून : क्रिकेटर विराट कोहलीनं आपली पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात कारमधून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणाला अनुष्काने फटकारून काढलंय. हा तरुण कारमधून रस्त्यावर कचरा फेकत होता, त्याला पाहताच कार थांबवून "तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकताय, यापुढे लक्षात ठेवा रस्त्यावर असा कचरा फेकू नका" असं अनुष्काने सुनावलंय. आता त्याच तरुणानं फेसबुकवरून याला उत्तर दिलंय.

या तरुणाचं नाव आहे अरहान सिंह. त्यानं फेसबुकवर काय झालं ते लिहिलंय, ' रस्त्यावर प्लास्टिकची बाटली पडली. त्यावर अनुष्का शर्मानं रस्त्यावरच्या व्यक्तीप्रमाणे आरडाओरड सुरू केली. त्यानं माफी मागितल्यावरही तिनं ऐकलं नाही. ' तो म्हणतो, कारमधून बाहेर पडलेल्या कचऱ्यापेक्षा अनुष्काच्या तोंडातून जो 'कचरा' बाहेर पडला, तो जास्त होता. विराट कोहलीनं व्हिडिओ शूट करून शेअर स्वत:च्या फायद्यासाठी केल्याचंही अरहान म्हणतो.

हेही वाचा

कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ

First published: June 17, 2018, 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading