विरानुष्काने कचऱ्यासाठी ज्याला फटकारलं,त्याने पाठवली नोटीस

'विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2018 09:19 PM IST

विरानुष्काने कचऱ्यासाठी ज्याला फटकारलं,त्याने पाठवली नोटीस

मुंबई, 23 जून : अनुष्का शर्माने गेल्याच आठवड्यात एका तरुणाला रस्त्यावर कचरा टाकण्यावरून फटकारलं होतं. अनुष्काचा हा व्हिडिओ विराटने शेअर केला होता. अनुष्काच्या फटकारण्यावर आता कायदेशीर नोटीस जारी झाली आहे. ही नोटीस फरहान सिंह ज्याला अनुष्काने व्हिडिओ मध्ये अपमानित केलं होतं,  त्याने पाठवली आहे.

VIDEO : कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ

सगळ्यांसमोर अपमानित करणे आणि व्हिडिओ व्हायरल करणे यासाठी नोटीस जारी केली आहे.

अनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम!

विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात अनुष्का एका तरुणाला रागवताना दिसत आहे. एका आलिशान गाडीतून जाणाऱ्या मुलाला अनुष्का रस्त्यावरच ओरडू लागली कारण त्या रस्त्याने जाताना रस्त्यावरच कचरा टाकला होता.

Loading...

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यानं अनुष्काला काय दिलं प्रत्युत्तर?

हा व्हिडिओ शेअर करताना विराटने 'महागड्या आलिशान गाडीत फिरतात मात्र यांची बुद्धी खराब आहे. असे लोक आपला देश स्वच्छ ठेऊ शकत नाहीत' असं ट्विटही केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...