Home /News /entertainment /

अनुष्का-विराटच्या अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा Unseen फोटो LEAK! फोटोतून मुलगी वामिका गायब

अनुष्का-विराटच्या अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा Unseen फोटो LEAK! फोटोतून मुलगी वामिका गायब

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली यांनी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला.

  मुंबई, 16 डिसेंबर-  अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली  (Virat Kohli)  यांनी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. या फोटोंमध्ये त्यांची लहान मुलगी वामिकाही दिसत होती. दोघांच्या चाहत्यांना ते फोटो खूप आवडले होते. दरम्यान आता अनुष्का-विराटच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा एक न पाहिलेला फोटो समोर आला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.फोटोमध्ये हे दोघे आपल्या कुटुंबियांसोबत दिसत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या कुटुंबीयांसोबत फोटोच्या मध्यभागी असल्याचे दिसत आहेत. दोघांनी एकमेकांना मोठ्या प्रेमाने मिठी मारली आहे. या फोटोमध्ये अनुष्काचे आई-वडील तिचा भाऊ कर्णेश शर्मा दिसून येत आहे. तसेच विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली आणि त्याची पत्नी चेतना कोहलीसुद्धा दिसत आहेत. यासोबतच फोटोमध्ये त्याचे काही खास मित्रही आहेत.तसेच फोटोमध्ये सर्वात पुढे अनुष्का आणि विराटचा लाडका डॉगी 'ड्युड'सुद्धा दिसून येत आहे. हा फोटो समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते या फोटोला खूपच पसंत करत आहेत.
  भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Anushka Wedding Anniversary) यांनी आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस नुकताच साजरा केला आहे. यानिमित्त विराट कोहलीने (Virat Kohli) अनुष्का शर्मासाठी (Anushka Sharma) इमोशनल मेसेजही लिहिला होता. विराटने अनुष्का आणि मुलगी वामिकासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले होते. या फोटोंसोबतच त्याने भावुक असं कॅप्शनसुद्धा दिलं होतं. (हे वाचा:लग्नाच्या वाढदिवशी विराटने बायकोसोबत घासली भांडी, अनुष्काने शेयर केले ... ) अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट 2013 मध्ये भेटले होते जेव्हा दोघे एका शॅम्पूची जाहिरात करत होते. इथून दोघांनी डेटिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर 11 डिसेंबर 2017 मध्ये दोघांचं इटलीमध्ये लग्न झालं. 11 जानेवारी 2021 ला विराट आणि अनुष्काला मुलगी झाली. या दोघांनी मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे. विराटनं आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करण्यासाठी जे ट्विट केलं होतं ते, या वर्षीचं सर्वांत जास्त लाईक्स मिळवलेलं ट्विट (Most Liked Tweet) ठरलं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Anushka sharma, Entertainment, Virat kohli

  पुढील बातम्या