Home /News /entertainment /

'जन्माला यायच्या आधीच बाळाच्या नावावर...' त्या PHOTOSHOOT नंतर अनुष्का शर्मा झाली ट्रोल

'जन्माला यायच्या आधीच बाळाच्या नावावर...' त्या PHOTOSHOOT नंतर अनुष्का शर्मा झाली ट्रोल

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) नुकतंच वोग (Vogue) या मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. त्यामध्ये अनुष्काने तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट केला होता.

  मुंबई, 04 जानेवारी : भारतातील सर्वात जास्त चर्चेत असणारे जोडपे विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच आई वडील होणार आहेत. नुकतेच अनुष्का शर्मा हिने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण तिच्या या फोटोंचे कौतुक करत आहेत तर अनेकांनी तिच्या या फोटोवर टीका केली आहे. या फोटोंमध्ये ती आपले बेबी बंप (Baby Bump) फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आपण आई होणार असल्याची घोषणा केल्यानंतर ती आपल्या बेबी फ्लॉन्टचे फोटो दर महिन्याला शेअर करत असते. अनुष्काने वोग (Vogue) मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे. आपले या फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर केले आहेत. चार फोटो शेअर केले असून यामध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसून येत आहे. यामध्ये तिने पांढरा लाँग कोट घातलेली दिसून येत आहे. ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसून येत आहे.
  परंतु तिच्या या फोटोंमुळे सध्या ती जोरदार ट्रोल होताना दिसून येत आहे. यामध्ये एकाने हे फोटोशूट भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने आपल्या न जन्मलेल्या मुलाची जाहिरात असल्याचे म्हटले आहे. आपल्या न जन्मलेल्या मुलाच्या माध्यमातून ती पैसे कमवत असल्याची टीकादेखील एका युजरने केली आहे. तुला आणि तुझ्या मुलाला देवाचा आशीर्वाद मिळो अशी प्रार्थना देखील त्याने केली आहे. त्याचबरोबर आणखी एकाने हे फोटोशूट खासगी ठेवण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावर ते शेअर करण्याची गरज नसल्याचे देखील त्याने म्हटले आहे. दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये आपण आई वडील होणार असल्याची घोषणा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केली होती. या महिन्यामध्ये अनुष्का शर्मा आपल्या मुलाला जन्म देणार असून यानंतर ती तिच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Anushka sharma

  पुढील बातम्या