अनुष्का शर्मानं प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली...

अनुष्का शर्मानं प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली...

मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खरं तर ही पहिली वेळ नाही की बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु आहे. लग्नानंतर प्रत्येक अभिनेत्रीच्या बाबतीत घडतं. सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही असंच काहीसं घडत आहे. त्यानंतर आता अनुष्का शर्माच्या बाबतीतही असंच होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अनुष्काला प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर देताना अनुष्का चिडलेली दिसली.

शाहरुखची लेक सुहानानं शेअर केला आणखी एक HOT फोटो, खान कुटुंबाचा मालदीव स्वॅग

काही दिवसांपूर्वीच अनुष्कानं फिल्मफेअर मासिकाला एक मुलाखात दिली. यावेळी बोलताना अनुष्का म्हणाली, 'लोकांनी आम्हाला कमीत कमी एवढी तरी सूट द्यावी की आम्ही आमच्या आयुष्यात शांतपणे जगू शकू. एक अभिनेत्री लग्न करते आणि तिला त्यानंतर पुढे एकच प्रश्न विचारला जातो. तो प्रेग्नंसीशी जोडलेला असतो. जेव्हा आम्ही डेट करत असतो त्यावेळी लग्न कधी करणार हा प्रश्न असतो. तुम्ही लोकांना त्यांचं आयुष्य जगायला द्यायला हवं. कारण अशा लोकांमुळे काही अशी परिस्थिती निर्माण होते की, आम्हाला जबरदस्तीनं त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. मला ही गोष्ट खूप खराब वाटते. मला याहून जास्त काही स्पष्टीकरण देणं गरजेच वाटत नाही.'

देसी गर्लसाठी डोकेदुखी ठरलं मियामी व्हेकेशन, सर्वच फोटो ठरले वादग्रस्त

 

View this post on Instagram

 

Seal the silly moments ❣️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर, ती शेवटची शाहरुख खानच्या ‘झीरो’ सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. पण अनुष्काच्या अभिनेयाचं कौतुक मात्र झालं. या सिनेमात तिनं डिफ्रेंटली एबल्ड नासा सायंटिस्टची भूमिका साकारली होती. याशिवाय तिच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर काही दिवस पती विराट कोहलीसोबत यूकेमध्ये होती. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला हार पत्कारावी लागल्यानंतर विराट आणि अनुष्कानं काही दिवस युकेमध्ये घालवले. दरम्यान यावेळचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

VIDEO मलायकावरच्या प्रेम अर्जुननं असं केलं जाहीर? टॅटूचा फोटो VIRAL

=====================================================================

आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 10:57 AM IST

ताज्या बातम्या