मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लेकीचा चेहरा दाखवल्याने मीडिया हाऊसवर भडकली अनुष्का शर्मा, पोस्ट लिहित केला राग व्यक्त

लेकीचा चेहरा दाखवल्याने मीडिया हाऊसवर भडकली अनुष्का शर्मा, पोस्ट लिहित केला राग व्यक्त

मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अनुष्काने मीडिया हाऊसला चांगलेच खडसावलं आहे. अनुष्काने सोशल मीडियावर ( Anushka Sharma latest Post) एक पोस्ट शेअर करत त्या मीडिया हाऊसचं नाव घेत त्यांचा चांगलाच क्लास घेतला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 15 जून-  सेलेब्सपेक्षा सोशल मीडियावरत त्यांच्या मुलांचा जास्त चाहता वर्ग पाहायला मिळतो. सेलेब्सच्या मुलांची पहिली झलक टिपण्यासाठी पापाराझी नेहमीच क्रेझी असतात. असं जरी असलं तरी स्टार्स नेहमीच आपल्या मुलांना कॅमेऱ्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बॉलिवूडमधील काही कलाकार त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत व पापाराझींना देखील करून देत नाहीत. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं देखील आजपर्यंत आपली मुलगी वामिका (Vamika Kohli) हिला मीडियापासून लांब ठेवलं आहे. अनुष्काने आजपर्यंत तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असताना कधीही तिचा चेहरा दाखवला नाही. तिनं जितके वामिकाचे फोटो शेअर केले आहेत, तेवढे फोटो तिचे पाटमोरे असेच आहेत. ज्यात तिचा चेहरा दिसणार नाही याची पूर्ण काळजी अनुष्का घेताना दिसते. असं असताना सध्या वामिकाचा एक  ( Anushka Sharma Slams Media House )  फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अनुष्काने मीडिया हाऊसला चांगलेच खडसावलं आहे. अनुष्काने सोशल मीडियावर ( Anushka Sharma latest Post) एक पोस्ट शेअर करत त्या मीडिया हाऊसचं नाव घेत त्यांचा चांगलाच क्लास घेतला आहे.

नेमकी पोस्ट काय आहे अनुष्का शर्माची?

अनुष्का आणि विराट नुकतेट मालदीवला गेले होते. या काळातला एक फोटो मीडिया हाऊसने त्यांच्या इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. यामध्ये वामिकाचा फोटो स्पष्ट दिसत आहे. यामुळेच अनुष्का त्या मीडिया हाऊसवर चांगलीच भडकली आहे. नंतर त्या मीडिया हाऊसने ती पोस्ट डिलीट केली. यानंतर अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, मीड़िया हाऊसला वाटते की ती त्यांच्या मुलांना का चांगले आहे आणि काय वाईट आहे हे त्यांच्या आई वडिलांनपेक्षा जास्त चांगले समजते. कारण अनेकवेळा विनंती करून देखील ते फोटो काढत असतात आणि पोस्ट देखील करत असतात. दुसऱ्या मीडिआ हाऊस आणि पापारझींपासून काही तरी शिका जरा..असं अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अनुष्का शर्माच्या कामाबद्दल सांगायचे तर, ती खूप मोठ्या गॅप नंतर अभिनय क्षेत्रात काम करणार आहे. लवकरच ती'चकदा एक्सप्रेस' या सिनेमात दिसणार आहे. सध्या ती यामध्ये व्यस्त आहे.

First published:

Tags: Anushka sharma, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Virat kohli and anushka sharma