मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अनुष्कानं शेअर केला प्रेग्नन्सीनंतरचा पहिला सिंगल फोटो, दिलं मजेशीर कॅप्शन

अनुष्कानं शेअर केला प्रेग्नन्सीनंतरचा पहिला सिंगल फोटो, दिलं मजेशीर कॅप्शन

अनुष्कानं (Anushka Sharma) प्रेग्नन्सीनंतरचा आपला पहिला सिंगल फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं या फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे.

अनुष्कानं (Anushka Sharma) प्रेग्नन्सीनंतरचा आपला पहिला सिंगल फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं या फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे.

अनुष्कानं (Anushka Sharma) प्रेग्नन्सीनंतरचा आपला पहिला सिंगल फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं या फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे.

मुंबई 7 फेब्रुवारी : विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) आपल्या मुलीसोबतचा पहिला फोटो शेअर करत तिचं नावंही सांगितलं होतं. विराट आणि अनुष्का गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीमुळं चर्चेत आहेत. अशात आता अनुष्कानं प्रेग्नन्सीनंतरचा आपला पहिला सिंगल फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो लक्ष वेधणारा आहे.

अनुष्कानं शेअर केला फोटो -

अनुष्कानं मुलीला जन्म दिल्यानंतरचा आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री अतिशय फीट दिसत आहे. यातही ती आधीसारखीच फीट आणि सुंदर दिसत आहे. हा फोटो वर्कआउटच्या वेळचा असल्याचं म्हटलं जात आहे. अनुष्कानं आपला हा खास फोटो शेअर करत याला कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली, माझा आवडीचा ड्रेस कोड. यासोबतच तिनं एक स्माइली इमोजीदेखील शेअर केली आहे. अनुष्काचा हा फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून या फोटोला भरपूर लाईक आणि कमेंट मिळताना दिसत आहे.

विराट कोहलीनं मागील काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, की तो बाळाचं डायपर बदलणं शिकला आहे. विराट म्हणाला, अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळून आता मी फ्लेक्झिबल झालो आहे. त्यामुळं डायपर बदलणं हे काम शिकणं माझ्यासाठी तितकं अवघड नव्हतं. कारण, मला हे शिकायचं होतं.

मुलीचं नाव ठेवलं वामिका -

विराट आणि अनुष्कानं आपल्या मुलीचं नाव वामिका ठेवलं आहे. या नावाचा अर्थ 'दुर्गा' असा आहे. वामिका हे दुर्गा देवीचं आणखी एक नाव आहे.

First published:

Tags: Anushka sharma, Virat anushka, Virat kohli