मुंबई, 16 जानेवारी- गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) कारकीर्द चढ-उतारांची राहिली आहे. अल्पावधितच 70 शतके फटकावणारा विराट गेल्या काही काळात आपल्या चाहत्यांना शतकी भेट देऊ शकला नाही. त्यातच विराटच्या कर्णधार म्हणून कामगिरीवरही शंका उपस्थित होत होती. अशातच दक्षिण आफ्रिकेवरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने थेट कर्णधार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. कोहलीच्या या निर्णयावर त्याचे चाहते तर नाराज झाले आहेतच, तसेच पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma recalls Virat Kohli’s journey as he steps down as Test captain)एक भावुक पोस्ट केली आहे.
अनुष्काने विराटचा एक हसतानाचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “मला 2014 मधील तो दिवस आठवतोय. जेव्हा तू मला सांगितलं होतं की, तू भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बनला आहेस. कारण महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर एमएस, तू आणि मी दुसऱ्याच दिवशी भेटलो आणि गप्पा मारल्या. तेव्हा धोनी तुला म्हणाला होता की, आता बघ किती लवकर तुझी दाढी पांढरी व्हायला सुरुवात होईल. यावर आपण सगळेच खूप हसलो होतो.
वाचा-Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर भावूक झाली पत्नी अनुष्का, म्हणाली...
त्यानंतर मी तुझी दाढी पांढरी होण्याशिवाय इतरही खूप काही पाहिलं आहे. मी प्रगती पाहिलीय तुझ्या आसपास आणि तुझ्यातही. आणि हो, मला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझी प्रगती आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने केलेल्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. पण त्याहून अधिक तुझ्यात जी प्रगती केलीय, त्याचा मला अधिक अभिमान आहे,” अशी भावना अनुष्काने व्यक्त केली आहे.
“सन 2014 मध्ये तू एकदम तरुण होतास. सद्हेतू, सकारात्मकता आणि ध्येय आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातात. ते पुढे घेऊन तर जातात परंतु अनेक आव्हानेही असतात. अशा अनेक आव्हानांना तू सामोरं गेलास. ती केवळ मैदानातीलच नव्हती तर मैदानाबाहेरचीही होती. पण कदाचित हेच तर जीवन आहे. नाही का ? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की, तू तुझ्या उदात्त हेतूंपुढं कोणताही अडथळा उभा राहू दिला नाही.
वाचा-Virat Kohli Steps Down: टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कॅप्टननं पद का सोडले?
तू एक उदाहरण सेट करतानाच प्रत्येक विजयासाठी सर्वस्व झोकून प्रयत्न केले. आपली सगळी शक्ती पणाला लावली. आणि काही पराभवानंतर शेजारी बसले असताना मी तुझ्या डोळ्यात अश्रूही पाहिले. तू कायम कमतरता कुठे राहिली आणि त्यावर कशी मात करता आली असती याचाच विचार करत होतास. तू असाच आहेस आणि इतरांकडूनही तीच अपेक्षा केलीस. तुला नेहमीच नव्या रुपात आणि बेधडकच पाहिले आहे.
दिखावा करणं तुला कधीच आवडलं नाही. हीच बाब माझ्या दृष्टीने तुला महान बनवते. हीच तुझ्यातील अस्सलता आहे. कधीच कुठली चमचेगिरी नाही. प्रत्येकजण ही बाब समजूही शकत नाही. मी पूर्वीच म्हटलंय की, ते लोक खरंच धन्य आहेत, जे तुला खऱ्या अर्थानं ओळखू शकलेत. तू पर्फेक्ट नाहीस, तुझ्यातही कमतरता आहेत. परंतु, तू ते कधील लपवून ठेवलं नाही. तू नेहमीच खऱ्याची साथ दिलीस. अवघड आव्हान स्वीकारलंस. कधी कोणत्या गोष्टीसाठी भीक नाही मागितलीस. या पदावर पोहचण्यासाठीही नाही.
View this post on Instagram
जेव्हा कुणी एखाद्या गोष्टीला धरून बसतो तेव्हा तो तेवढ्यापुरताच मर्यादित राहतो. आणि माय लव, तू तर असिमित आहेस. आपली मुलगी वडिलांच्या या 7 वर्षांपासून खूप काही शिकेल. तू खूप चांगलं केलंयस,” असं म्हणत अनुष्कानं विराटच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
वाचा-विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्मा Shocked, म्हणाला....
दरम्यान, अनुष्का शर्मा सर्वच दौऱ्यांमध्ये विराटसोबत जात असते. मुलगी वामिकाही त्यांच्यासोबतच असते. कित्येकदा मैदानातही अनुष्का विराटला प्रोत्साहन देताना दिसली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Bollywood News, Cricket news, Entertainment, Virat kohli, Virat kohli and anushka sharma