मुंबई, 09 नोव्हेंबर : अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या काही दिवसांपासून तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. अनुष्कानं नुकतंच वोग या प्रसिद्ध मासिकासाठी हॉट फोटोशूट केलं. या दरम्यान याच मासिकाला दिलेल्या मुलाखीत अनुष्का तिच्या पर्सनल लाइफबद्दल बोलली. यावेळी तिनं तिच्या आणि विराटच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. तसेच ती अनेकदा विराटचे कपडे घालत असल्याचा खुलासाही तिनं या मुलाखतीत केला.
अनुष्काचा पती विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वीच 31 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्त या दोघांनी भूटानमध्ये ट्रेकचा आनंद घेतला. त्यावेळचे अनेक फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान वोग मासिकाला दिलेली मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत अनुष्कानं ती विराटचे कपडे घालते आणि त्यावर विराटची प्रतिक्रिया काय असते याचा खुलासा केला.
निकाल अयोध्या प्रकरणाचा पण ट्रोल होतोय अक्षय कुमार, तुम्ही हे PHOTO पाहिलेत का?
अनुष्का म्हणाली, ‘विराट माझ्या या कृतीवर खूप खूश असतो. मी अनेकदा त्याचे कपडे घालते, खासकरून त्याचे टीशर्ट्स मी घालते. कधी कधी मी त्याचे जॅकेट्स सुद्धा घालते. अनेकदा मी असं यासाठी करते कारण त्यातून मला आनंद मिळतो.’ अनुष्कानं या गोष्टीचा खुलासा आता केला असला तरी अनेकदा तिला विराटच्या कपड्यांमध्ये स्पॉट केलं गेलं आहे.
KBC 11 : ...आणि अमिताभ बच्चन म्हणले, 'तुम्हाला काही शिस्त आहे का नाही?'
विराट आणि अनुष्का यांनी डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर या दोघांनी अनेकदा त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनुष्काच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती शेवटची शाहरुख खानसोबत झीरो सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती बराच काळ बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र लवकरच ती एका रोमँटिक सिनेमात दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
'या' बॉलिवूड सेलिब्रेटींनी अचानक मोडला अनेक वर्षांचा संसार!
===================================================================
VIDEO : आता कुणी राजकीय फायदा उचलू नये-पृथ्वीराज चव्हाण