मुंबई, 17 मे - अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) लेक वामिकाच्या (Vamika) जन्मानंतर मोठ्या काळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. अनुष्काचे सलग ३-४ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा चित्रपट म्हणजे चकदा एक्सप्रेस(Chakda Xpress) . भारतीय महिला क्रिकेट संघातील बॉलर झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अनुष्का मुख्य भूमिका साकारत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्काच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमासाठी अनुष्काने प्रचंड मेहनत घेतली असून तिच्या अनेक व्हिडीओ आणि फोटो तसेच सिनेमाच्या फर्स्ट लूकमधून ती दिसून आली. अनुष्काने सिनेमासाठी घेतलेली मेहनत आपण अनेक दिवस पाहत आहोत. चित्रपटातून देखील आपल्याला ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या प्रवासात अनुष्काला पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) देखील मोलाची मदत केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अनुष्काने विराटने तिला चित्रपटादरम्यान काही बॅटींग टिप्स दिल्याचे सांगितले.
Harper's Bazar ला अनुष्काने मुलाखत दिली, याबाबत पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, "चित्रपटासाठी क्रिकेटसंदर्भात मी माझ्या कोचकडून प्रशिक्षण घेत होते. त्याचप्रमाणे माझ्यात होणारी प्रोगरेस मी नेहमी विराटला सांगत असत. माझे व्हिडीओ विराटला दाखवून त्याच्याकडून प्रतिक्रिया मिळवायला मला नेहमी आवडायचं. परंतु विराट हा ब्लॉलर नसल्याने सर्वाधिक गोष्टी मला कोचच्याच ऐकाव्या लागत होत्या. असं असलं तरी विराटने मला बॅटींग करण्यासाठीच्या चांगल्या टीप्स दिल्या".
अनुष्का पुढे म्हणाली, "क्रिकेट हा खेळ मानसिक तसेच शारीरिकरित्या थकवणारा आहे. विराटला मी मैदानावर प्रचंड मेहनत करताना पाहिले आहे. विराट जेव्हा त्याचा खेळ खेळून सेटवर यायचा तेव्हा आम्ही कधी चांगल्या हवेच्या ठिकाणी तर कधी लेट नाईट शूट करायचो तेव्हा तो मला म्हणायचा तुम्ही असं काम कसं करता? परंतु आता मी त्याला म्हणते की, तू आणि इतर खेळाडू तुम्ही इतकी मेहनत कशी घेता?"
हेही वाचा - नेहा कक्करच्या पतीसोबत हॉटेलमध्ये घडला होता चोरीचा प्रकार,आता पोलिसांची मोठी कारवाई
चकदा एक्सप्रेस या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अनुष्काने तिच्यासाठी हा सिनेमा फार जवळचा आणि महत्त्वाचा असल्याचं सांगितलं होतं. तिने सोशल मीडियावर वर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं, "हा चित्रपट माझ्यासाठी फार स्पेशल आहे कारण यात एका त्यागाची कहाणी आहे".
चकदा एक्सप्रेस हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट टीमच्या माजी कॅप्टन झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्या काळात महिलांना तितकं मानाचं स्थान नव्हतं त्या काळात झूलन यांनी मी क्रिकेटर होणार आणि भारताला एक नवीन ओळख निर्माण करुन देण्याचा ध्यास घेतला. त्यांनी त्यांची वेगळी ओळख समाजापुढे निर्माण केली. त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास चकदा एक्सप्रेस या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Virat kohli, Virat kohli and anushka sharma