अनुष्कानं सांगितलं वयाच्या 29 व्या वर्षी विराटशी लग्न करण्याचं कारण

अनुष्कानं सांगितलं वयाच्या 29 व्या वर्षी विराटशी लग्न करण्याचं कारण

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्कानं करिअरच्या ऐन उभारीच्या काळात लग्न करण्याविषयीचा खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली 2017मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांचं टस्कनीमधील डेस्टिनेशन वेडिंग प्रचंड गाजलं. लग्नाच्या वेळी अनुष्काचं वय 29 वर्ष होतं. त्यामुळे जर कमिटमेंट होती तर मग अनुष्कानं लग्नाची घाई का केली असा प्रश्न नेहमीच लोकांच्या मनात राहिला. पण काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्कानं करिअरच्या ऐन उभारीच्या काळात लग्न करण्याविषयीचा खुलासा केला आहे.

फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्कानं वयाच्या 29 व्या वर्षी लग्न का केलं यामागचं कारण सांगितलं. अनुष्का म्हणाली, आमचे चाहते आमच्याशी एवढे जोडले गेले आहेत जेवढी आमची इंडस्ट्रीसुद्धा आमच्याशी जोडलेली नाही. त्यामुळे ते फक्त तुम्हाला स्क्रीनवर एकत्र पाहू इच्छितात. तुमच्या खासगी आयुष्यात काय चाललं आहे याचा त्यांना अजिबात फरक पडत नाही.

अनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL

अनुष्का पुढे म्हणाली, ‘तुमचं लग्न झालं आहे की नाही याचा त्यांना काहीही फरक पडत नाही. मी वयाच्या 29 व्या वर्षी लग्न केलं जे अनेक अभिनेत्री त्याच्या करिअरच्या उभारीच्या काळात करत नाहीत. पण मी हे केलं कारण, माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि मी आताही त्याच्यावर तेवढंच प्रेम करते. लग्न एक अशी गोष्ट आहे. जी तुमच्या नात्याला पुढे घेऊन जाते. महिलांना समान वागणूक मिळावी यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले आहेत.’

हृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक

अनुष्का सांगते, खासगी आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना तुमच्या आयुष्यात कोणतीही भीती असू नये असं मला वाटतं. जर एका पुरुषाला लग्न करून त्यानंतर काम करताना भीती वाटत नसेल तर मग स्त्रियांनाही तशी भीती वाटायला नको. त्या सुद्धा कमी वयात लग्न करून त्यानंतर त्यांचं करिअर सांभळू शकतात. माझ्यानंतर अनेक अभिनेत्रींनी लग्न केली. तसेच अनेक प्रेम करणाऱ्यांनी स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली. याचा मला खूप आनंद वाटतो.

वयाच्या 19 व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत कतरिनानं दिला होता लिपलॉक सीन

====================================================

कोंबडा भिडला सापला, VIDEO व्हायरल

First published: July 16, 2019, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading