सलमान खानसोबत काम करण्याबाबत अनुष्कानं सोडलं मौन, सांगितलं सत्य

सलमान खानसोबत काम करण्याबाबत अनुष्कानं सोडलं मौन, सांगितलं सत्य

अभिनेत्री अनुष्का शर्मा सलमान खानसोबत काम करणार, ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. बाॅलिवूडमध्ये तर कुठल्याही विषयावर चर्चा करायला पेवच फुटतं.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : अभिनेत्री अनुष्का शर्मा सलमान खानसोबत काम करणार, ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. बाॅलिवूडमध्ये तर कुठल्याही विषयावर चर्चा करायला पेवच फुटतं. संजय लीला भन्साळींना सलमान-अनुष्का सिनेमासाठी एकत्र हवेत, अशी बातमी होती.

यावर पहिल्यांदाच अनुष्का शर्मानं आपलं तोंड उघडलं. ती म्हणाली, ' मला संजय लीला भन्साळींसोबत काम करायला नक्कीच आवडेल. पण अजून असं काही झालेलं नाही. मी सिनेमा साईन केलेला नाही.'

सध्या अनुष्का आॅस्ट्रेलियाला आहे. विराटसोबत ती आज ( 11 डिसेंबर ) लग्नाचा वाढदिवस साजरा करतेय. तसंच पुढच्या काही दिवसांत ती झीरो सिनेमाचं प्रमोशन करण्यात बिझी असेल.

झिरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तीरेखा साकारली आहे. प्रत्येकवेळी आपल्या अभिनयातून प्रक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.

त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, जुही चावला, करिष्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे.

उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित झिरो चित्रपट आहे. 1989 रोजी कमल हसनने ’अप्पू राजा’ सिनेमातून अशा बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 31 वर्षांनी असा वेगळा प्रयोग ‘झिरो’ चित्रपटातून तयार करण्यात आला आहे.


Birthday Special : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 02:56 PM IST

ताज्या बातम्या