चिमुकलीवर गँगरेप! बलात्काराऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अनुष्का शर्मानं ट्विटरवर व्यक्त केला संताप

चिमुकलीवर गँगरेप! बलात्काराऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अनुष्का शर्मानं ट्विटरवर व्यक्त केला संताप

विकृती! तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, बलात्कारानंतर धारदार शस्त्रानं डोकं कापून धडापासून केलं वेगळं

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : झाराखंडच्या जमशेदपूर येथे एका 3 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिचा बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. त्यानंतर सर्वच स्तरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात असतानाच अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा या घटनेमुळे भडकलेली दिसत आहे. या घटनेनंतर अनुष्कानं तिच्या ट्विटरवरून पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. सध्या तिचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

जमशेदपूर येथील या बलात्काराच्या घटनेनंतर अनुष्कानं एकामागोमाग एक 2 ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, ‘जमशेदपूर येथे रेल्वेस्टेशनवर आईशिवाय झोपलेल्या 3 वर्षीय मुलीवर अशाप्रकारे अत्याचार करुन तिचा खून करणं अत्यंत अमानुष आहे. या घटनेनं मला अक्षरशः हादरवून सोडलं. ही गोष्ट खूपच संतापजनक आहे’

दिया मिर्झाच नाही तर 'या' बॉलिवूड कलाकारांचेही घटस्फोट ठरले होते धक्कादायक!

दुसऱ्या ट्वीटमध्ये अनुष्का म्हणते, ‘मी आशा करते की, या घटनेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या नराधमास अशी शिक्षा व्हायला हवी की, पुन्हा कधीच कोणीही अशाप्रकारचं किळसवाणं  आणि राक्षसी काम करण्याचं धाडस कोणालाच होऊ नये.’

काय आहे घटना

माणुसकीला काळिमा फासणारी आणि संताप आणणारी घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशनवर आपल्या आईजवळ झोपलेल्या 3 वर्षांच्या चिमुकलीचं एकानं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे त्या नराधमानं मित्रासोबत मिळून चिमुकलीवर अत्याचार केले. वेदना असह्य होऊ लागल्यानं पीडित मुलगी रडू लागली तेव्हा या वासनांधांनी धारदार शस्त्रांनी तिचं डोकं कापून धडापासून वेगळं केलं. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रकार झारखंडमधील जमशेदपूर येथील आहे.  या चिमुकलीचं शीर नसलेला मृतदेह पोलिसांना मंगळवारी (30 जुलै) सापडला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुलीचं शीर अद्यापही पोलिसांना मिळालेलं नाही.

Bigg Boss Marathi 2 : शिवच्या बहिणीचे मोलाचे सल्ले तर, शिवानी-बिचकुलेंमध्ये वाद

सीसीटीव्हीमुळे लागला आरोपींचा शोध  

25 जुलैला घडलेली ही घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना 5 दिवसांनंतर पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू साहू आणि त्याचा मित्र कैलाश कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी पश्चिम बंगालच्या झालदा जिल्ह्यातील रहिवासी होती आणि आरोपींनी तिचं टाटानगर रेल्वे स्टेशनवरून मुख्य आरोपी रिंकूनं अपहरण केलं होतं.

मुख्य आरोपीची आई गिरीडीहमध्ये हवालदार पदावर कार्यरत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी रिंकू साहूची आई गिरीडीह जिल्हा पोलीस मुख्यालयात हवालदार आहे. यापूर्वीही रिंकूवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर माझा मुलगा मानसिक रुग्ण आहे, अशी माहिती आरोपीच्या आईनं दिली.

लाखो रुपये खर्च करून ‘या’ ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात बॉलिवूड स्टार्स

आरोपींनी केला गुन्हा मान्य

चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे. चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह झाडीत फेकला होता. सध्या पोलीस दोघांचीही कसून चौकशी करत आहेत.

=============================================================================

VIDEO: मुंबईत हवामान विभागाकडून हाय अलर्ट, 'या' दिवशी मुसळ'धार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या