Home /News /entertainment /

प्रभासच्या 'आदिपुरुष' मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री अनुष्का शर्मा?

प्रभासच्या 'आदिपुरुष' मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री अनुष्का शर्मा?

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमामध्ये प्रभास (Prabhas) रामाची भूमिका साकारत आहे. सीतेच्या भूमिकेत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या सिनेमात असण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 12 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी तान्हाजी- द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) या  सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रभासबरोबर (Prabhas) त्यांचा हा आगामी सिनेमा असून रामायणावर आधारित या सिनेमाचे नाव 'आदिपुरुष' (Adipurush) ठेवण्यात आले आहे. प्रभास बरोबरच या सिनेमात सैफ अली खान (Saif Ali Khan) लंकेश अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार सीतेच्या भूमिकेत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या सिनेमात झळकणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात दिग्दर्शकाबरोबर बोलणी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार,सिनेमातील सीता या पात्रासाठी अनुष्का शर्माला निर्मात्यांची पहिली पसंती आहे. तिला या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यात आली असून ती या चित्रपटाची कथा ऐकून भारावली आहे. या अहवालानुसार दिग्दर्शक ओम राऊत यांच्याबरोबरची तिची भेट चांगली झाली असून तिला या पात्रासाठी जवळपास नक्की समजण्यात येत आहे. नुकतेच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपण आई वडील होणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अनुष्का शर्मा हिच्याबरोबरची बोलणी यशस्वी झाली आणि तिच्या तारखा जुळून आल्या तर त्यानुसार चित्रपटाच्या शूटिंगचे वेळापत्रक आखण्यात येणार आहे. (हे वाचा-सुशांतच्या फार्महाऊसवर सेलेब्रिटी घ्यायचे LSD आणि कोकेन,रियाची धक्कादायक माहिती) मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरीच्या दोन महिन्यानंतर अनुष्का  शूटिंगसाठी तयार आहे. हा सिनेमा रामायणावर आधारित असल्याने पहिल्या पूर्वार्धात अनुष्का शर्माचा रोल यामध्ये असणार नाही. जानेवारी 2021 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. त्यामुळे प्रभास आणि सैफ अली खान यांना घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केलं जाणार आहे. मात्र अनुष्का शर्मा हिला या चित्रपटासाठी साइन करण्यात आले आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (हे वाचा-रिया चक्रवर्ती सुशांतबरोबर घेत होती ड्रग्ज, Unseen Video आला समोर) काही दिवसांपूर्वी प्रभासने त्याच्या दोन बिग बजेट सिनेमांची घोषणा केली होती. 'राधे शाम' या सिनेमामध्ये त्याच्याबरोबर पूजा हेगडे दिसणार असून दुसऱ्या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण असणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Anushka sharma, Prabhas, Saif Ali Khan

    पुढील बातम्या