• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राजकुमार हिरानींचा दावा ठरला खोटा; अनुष्का शर्माचा 13 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

राजकुमार हिरानींचा दावा ठरला खोटा; अनुष्का शर्माचा 13 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

अनुष्का शर्माचा व्हिडीओ पाहून आमिर खानही झाला थक्क; म्हणाला, "डोळ्यांवर विश्वास बसत नाही...."

 • Share this:
  मुंबई 12 जून: 3 इडियस्ट (3 Idiots) हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan), शर्मन जोशी (Sherman Joshi) यांचं त्रिकूट आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचं जबरदस्त दिग्दर्शन यामुळं हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 3 इडियट्समध्ये अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिनं आमिरच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल या व्यक्तिरेखेसाठी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिनं देखील ऑडिशन दिलं होतं. तिच्या त्या ऑडिशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 2014 साली स्वत: अनुष्कानं हा व्हिडीओ आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांना दाखवला होता. त्यावेळी ते पी.के. चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला राजकुमार हिरानी यांना विश्वासच बसला नाही. कारण तिनं 3 इडियट्ससाठी ऑडिशन दिलं नव्हतं असं ते एकदा म्हणाले होते. मात्र या व्हिडीओमुळे त्यांचा तो दावा खोटा सिद्ध झाला. अनुष्काने तिच्या 3 इडियट्सच्य़ा ऑडिशनचा व्हिडीओ आमिर खान आणि राजकुमार हिरानीला दाखवल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसतंय. शिवाय ऑडिशन पाहून आमिर आणि राजकुमार हिरानी यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं देखील या व्हिडीओत दिसून येतंय. नुसरत जहाचा बेबी बम्प PHOTO VIRAL; अभिनेत्री गर्भवती असल्याची बातमी खरी ‘भावोजीसोबत होते संबंध’; शिल्पा शेट्टीच्या पतीनं पूर्वपत्नीबाबत केले खळबळजनक आरोप राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करणं हे अनुष्काचं स्वप्न होतं. त्यामुळं तिनं 3ड इडियट्ससाठी ऑडिशन दिलं होतं. परंतु या ऑडिशनमध्ये इतरही अनेक तरुणी होत्या. त्यामुळं कदाचित तिच्याकडे दुर्लक्ष झालं. अखेर ही व्यक्तिरेखा करीना कपूरला साकारण्याची संधी मिळाली. परंतु पी.के. चित्रपटाच्या निमित्तानं अनुष्काचं स्वप्न अखेर पुर्ण झालं. तिला राजकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
  Published by:Mandar Gurav
  First published: